सध्या बॉलिवूडमध्ये पार्ट्यांचीच चलती आहे असे म्हणावे लागेल. दर दिवशी कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीकडे मेजवानी ही असतेच. आधी इफ्तार पार्टी मग ईदची पार्टी आणि आता फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानेही आपल्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. ही पार्टी जरी छोटेखानी असली तरी मनिषच्या निकटवर्तीयांनी यावेळी आवर्जुन उपस्थिती लावली होती.

अन् पंडित अभिषेकी एकाएकी गायब झाले- अशोक पत्की

या पार्टीत करिना कपूर खान, कतरिना कैफ, मलायका अरोरा, सोफी चौधरी, नेहा धुपिया आणि अमृता अरोरा उपस्थित होत्या. या पार्टीची खास गोष्ट म्हणजे या सगळ्या बॉलिवूड दिवा कॅज्युअल लूकमध्ये आणि फार मेक-अप न करता आल्या होत्या. कतरिना, मलायका आणि सोफी यांनी डेनिमला प्राधान्य दिले होते तर करिना आणि नेहाने गाऊन घातला होता. अनेकींनी फक्त लिपस्टिक लावण्यालाच प्राधान्य दिले होते. कतरिना, करिना आणि नेहाने तर तेवढेही केले नाही. तरीही या तिघीही सर्वांमध्ये आकर्षक दिसत होत्या.

1-kareena-kapoor-khan

तैमुरच्या जन्मानंतर करिना मूळ साईजमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच ती ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. या सिनेमाची निर्मिती अनिल कपूरची मुलगी रेहा कपूर करणार असून सोनम कपूरचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

2-katrina-kaif

3-malaika-arora

4-sophie-choudry

5-neha-dhupia

6-manish-malhotra

कृष्णाला मोठा झटका, कपिलच्या शोमध्ये भारती सिंगने घेतली एण्ट्री

तर दुसरीकडे कतरिना सध्या तिचा आगामी जग्गा जासूस या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात कतरिनासोबत तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर रणबीर कपूरही दिसणार आहे. ‘जग्गा जासूस’शिवाय कतरिना लवकरच आमिर खानसोबत ‘ठग्ज ऑफ हिंदोस्थान’ सिनेमात दिसणार आहे. ठग्जमध्ये आमिर आणि कतरिनासोबत अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. यानंतर कतरिनाचा सलमान खानसोबतचा बहुप्रतिक्षीत ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हे संपूर्ण वर्ष कतरिनामय असेल असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.