टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे ही तिच्या ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे म्हटले जातेय. अंकिता आणि सुशांत सिंग राजपूत हे पवित्र रिश्ताच्या सेटवर प्रेमात पडले होते. जवळपास सहा वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर या दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर आता अंकिता याच मालिकेतील तिचा सहकलाकार करण मेहरा याला डेट करत असल्याचे वृत्त मिस मालिनी या वेब पोर्टलने दिले आहे. करणने मालिकेत नरेन ही व्यक्तिरेखा साकारली होती.
मिस मालिनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ८ च्या दरम्यान करण अंधेरी येथील वीरा देसाई रोडवर दिसला. तो फोनवर बोलत होता. रस्त्यावरून जाणा-या लोकांनी त्याला ओळखले होते. पण त्याची पर्वा न करता तो कोणाची तरी वाट पाहात होता. त्यानंतर काहीच वेळात एक रिक्षा आली आणि त्यातून अंकिता बाहेर पडली. करणने रिक्षावाल्याला पैसे दिले आणि मग दोघेही करणच्या घरी म्हणजे एम्पायर बिल्डिंग येथे गेले. अंकिता जणू काही झोपेतून उठून आली असावी त्याप्रमाणे तिने नाइटवेअर परिधान केलेले होते. यामुळे रस्त्यावरून जाणारी माणसे तिच्याकडे वळून वळून पाहत होती. याविषयी अंकिताशी संवाद साधला असता तिने हे वृत्त फेटाळून लावले.
अंकिता म्हणाली की, करण हा माझा जवळचा मित्र असून त्याची बायकोदेखील माझी चांगली मैत्रीण आहे. तो त्या बिल्डिंगमध्ये राहतो. त्यामुळे तो बहुदा तेथे फिरत असेल. एवढ्या सकाळी मी त्याला भेटायला कशाला जाऊ? लाइमलाइटपासून लांब राहणे मी पसंत करते. मी बाहेर जाण्यासही घाबरते कारण लोक काय बोलतील माहित नाही. माझ्या