सलमान खानची कथित प्रियसी लुलिया वंतूर हिचे सलमानसोबतचे भविष्य काय आहे हे याक्षणाला कोणीच काही सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या लुलियाच्या नावाभोवती उत्सुकतेचे वलय नेहमीच असते. ही उत्सुकताही तेव्हा वाढली जेव्हा लुलिया आणि कतरिना या समोरा समोर येतील की काय अशी अवस्था निर्माण झाली होती.

त्याचे झाले असे की, नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी सहायच्या रिसेप्शनमधे लुलिया आणि कतरिना दोघीही गेल्या होत्या. पण दोघांच्या वेळेत थोडासा फरक झाला, त्यामुळे दोघी एकमेकांच्या समोर आल्या नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या गाडीमधूनच लुलिया नीलच्या रिसेप्शला गेली होती. लुलियाने यावेळी काळ्या रंगाचा लेहंगा आणि चोळी घातली होती. तिच्या या ड्रेसमध्ये ती फार सुंदर दिसत होती.

प्रत्यक्षदर्शिने सांगितल्यानुसार, लुलिया पार्टीमध्ये अर्धा तास थांबली होती. जशी लुलिया पार्टीतून निघाली, त्याच्या काही मिनिटांनी कतरिना कैफ पार्टीमध्ये आली. यावेळी कतरिनाना हलक्या गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.

कतरिनाने, नीलसोबत ‘न्यूयॉर्क’ सिनेमात काम केले होते. शिवाय इतकी वर्ष सिनेसृष्टीचा एक महत्त्वपूर्ण भाग असल्यामुळे तिला या लग्नात आमंत्रण असणे स्वाभाविक होते. पण लुलियाचे मात्र तसे नाही. सलमान खानची मैत्रिण एवढीच तिची ओळख आहे. याआधी प्रिती झिंटाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्येही तिला आमंत्रित करण्यात आले होते.

दरम्यान, सलमान खान आणि त्याची तथाकथित प्रेयसी लुलिया वंतुर हे अद्यापही त्यांच्या नात्याबाबत सर्वांसमोर काहीच बोलले नाहीत. सलमान हा कबीर खानच्या आगामी ‘ट्युबलाइट’ सिनेमासाठी लडाखला गेला होता तेव्हा लुलिया आणि तिचे आई- वडिलही त्याच्यासोबत होते. गेल्या काही काळापासून सलमान खान आणि त्याची बहुचर्चित प्रेयसी लुलिया वंतूर यांच्या नात्यात दुरावा आल्यामुळेच लुलियाने तिच्या मायदेशी जाण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, तसे नाहीये. सध्या लुलिया म्हणजेच भाईजानची बहुचर्चित प्रेयसी भारतात आणि सलमानच्या ‘खान’दानमध्ये परत आली आहे.