अभिनेता सलमान खान आणि त्याची तथाकथित प्रेयसी लुलिया वंतूर यांच्यावरुन दररोज नव्या चर्चांना उधाण येत असते. बॉलिवूडच्या अनेक कार्यक्रमांपासून ते सलमानच्या घरगुती समारंभात दिसणारी ही मॉडेल चर्चेत आली ती म्हणजे तिच्या आणि सलमानमध्ये असणाऱ्या ‘मोर दॅन फ्रेण्डशीप’वाल्या नात्यासाठी.

सलमानच्या चित्रपटांच्या सेटवरही सर्रास दिसणारी लुलिया सध्या मात्र काही कामानिमित्त मायदेशी परतली आहे. लुलिया रोमानियाला असतानाही भारतात तिच्या नावाची चर्चा मात्र काही केल्या शमत नाही. लुलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नुकताच रोमानियामध्ये आलेल्या भूकंपाचा व्हिडिओ तिने शेअर केला. या व्हिडिओसह लिहिण्यात अलेल्या कॅप्शनमध्ये लुलियाने रोमानियाला भूकंप झाल्याचे स्पष्ट केले आहे.

लुलिया सुखरुप असून या भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. सलमान आणि लुलिया गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत अशी चर्चा आहे. पण, याबाबतची अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांसमोर उघड करण्यात आलेली नाही. असे असले तरीही सलमान आणि लुलियाच्या नात्याला त्यांच्या लग्नाच्या अनेक अफवांनी सुद्धा बराच रंग चढला होता.

वाचा: सलमान राहतं घर सोडणार?

दरम्यान लुलिया वंतूर रोमानियात असताना सलमान सध्या त्याच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असून कबीर खान या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे.