मूळची अयोध्याची असलेली अनुष्का कोणत्याही ‘गॉडफादर’शिवाय बॉलिवूड विश्वात आली आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीच्या अफेअरबद्दल सर्वांनाच माहित आहे. दोघेही नेहमीच चर्चेत असतात. मात्र विराटपूर्वी अनुष्काचे नाव एक-दोन नाही तर सहा जणांसोबत जोडलं गेलं. अनुष्काची ‘लव्ह लाईफ’ नेहमीच चर्चेत राहिली.

बॉलिवूडमध्ये पदार्पणापूर्वी अनुष्काने बंगळुरूमध्ये मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यावेळी रँप मॉडेल जोहेब युसूफशी तिची ओळख झाली. बराच काळ दोघांचं अफेअर चाललं. नंतर अनुष्काला यशराज बॅनरअंतर्गत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि जोहेबला मात्र बॉलिवूडमध्ये काहीच काम मिळालं नाही. अभिनय क्षेत्रात यश मिळाल्यानंतर अनुष्का जोहेबला विसरली आणि तो बंगळुरूला परतला. दोन वर्षांतच त्यांचं ब्रेकअप झालं.

अनुष्काचा पहिला चित्रपट ‘बँड बाजा बारात’ चांगलाच गाजला. याच चित्रपटातून रणवीर सिंगनंही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यादरम्यानही रणवीर आणि अनुष्काच्या अफेरची सर्वत्र चर्चा होती. ‘दिल धडकने दो’ आणि ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातही दोघांनी एकत्र काम केलं. मात्र त्यानंतर रणवीर दीपिका पदुकोणला डेट करू लागला.
रणवीर सिंगशी ब्रेकअपनंतर अनुष्का पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत अफेअरसाठी चर्चेत आली. दिग्दर्शक करण जोहरच्या एका पार्टीमध्ये दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले. ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. या अफेअरबाबत दोघांनी कधीच खुलासा केला नाही.

PHOTO: विराट-अनुष्काची ‘ग्रोसरी शॉपिंग’

विराट कोहलीपूर्वी क्रिकेटर सुरेश रैना अनुष्काचा आवडता खेळा़डू होता. लंडनमध्ये दोघांची ओळख झाली. या नात्याबद्दल दोघांनीही कधीच उघडपणे वाच्यता केली नाही आणि अखेर २०१५ मध्ये सुरैश रैना विवाहबंधनात अडकला.
अभिनेता शाहिद कपूरसोबतही अनुष्काचं नाव जोडलं गेलं. ‘बदमाश कंपनी’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली आणि शूटिंगदरम्यान आधी मैत्री आणि नंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं. इमरान खानच्या ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटाच्या यशानंतर पार्टी आयोजित करण्यात आली होती आणि या पार्टीत शाहिद आणि अनुष्का संपूर्ण वेळ एकत्रच होते. इतकेच नाही तर अभिनेता अर्जुन कपूरसोबतही अनुष्काचं अफेअर असल्याची चर्चा होती.