हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनची मुलगी एटा नग चक लामच्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहेत. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यात तिने ती लेसबियन असल्याचे म्हटले. एटाला चायनीज समुदायाकडून पाठिंबा मिळाला आहे. लोकांनी तिच्या पोस्टवर लिहिले की, ‘स्वतःच्या सुखापेक्षा दुसरे काहीच महत्त्वाचे नसते. तू खूश राहा.’ तिच्या लैंगिक प्राधान्यांबद्दल तिच्या मित्र-परिवाराचे मतही तिने या पोस्टमध्ये मांडले.

https://www.instagram.com/p/BZ6lfsNHije/

एटाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या प्रेयसीसोबतचा एक फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये तिने सांगितले की ती लेसबियन आहे. एटा १८ वर्षांची असून तिचे ३० वर्षीय अँडी ऑटमशी प्रेमसंबंध आहेत. अँडीनेही तिच्या इन्स्टाग्रामवर एटासोबतचा फोटो शेअर करत समलैगिंक असल्याची कबुली दिली. एटाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आम्हाला कुटुंब, समाज आणि मित्रांकडून विरोधाचा सामना करावा लागत आहे. पण या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाहीयेत. कारण माझी साथ द्यायला तू (अँडी) माझ्यासोबत आहेस.’

https://www.instagram.com/p/BZ276Nnn1Ar/

वडिलांशी नाते तोडले
एटा हॉलिवूड स्टार जॅकी चॅन आणि हाँग काँगची अभिनेत्री एलनी नग यांची मुलगी आहे. एका मुलाखतीत वडिलांबद्दल बोलताना एटाने सांगितले की, ‘ते माझे वडील नाहीत. त्यांच्यासाठी माझ्या मनात कोणत्याही भावना नाहीत. त्यांनी मला जन्म दिला असला तरी मी त्यांना कधीही माझे पिता मानले नाही. माझ्या आयुष्यात त्यांना काही स्थान नाही. मी कधीच म्हणणार नाही की जॅकी चॅन माझे वडील आहेत. मी म्हणेन की, ओह, जॅकी चॅन… एक अभिनेता.’

जॅकीला जॉन लिन या पत्नीपासून एक मुलगा आहे. जेयसी असे त्याचे नाव असून तो ३४ वर्षांचा आहे. १९८२ मध्ये जॅकीचे लिनसोबत लग्न झाले होते.