पावसाळा आला की सर्वांचेच पाय काही खास ठिकाणांकडे वळतात. निसर्गाला आलेला बहर आणि सोबत पावसाच्या चिंब सरींचा शिडकावा अनुभवण्यासाठी शहरानजीकची ठिकाणं शोधण्यावरच अनेकांचा भर असतो. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे अलिबाग. मुंबई आणि आसपासच्या शहरांतूनही अलिबागमध्ये येणाऱ्यांची सख्या कमी नाही. समुद्र आणि रस्त्याच्या मार्गाने या ठिकाणी पोहोचता येतं. पावसाळ्यामध्ये समुद्री मार्गाचा पर्याय बंद असल्यामुळे रस्त्याच्याच मार्गाने या ठिकाणी पोहोचता येत आहे. पण, इथवर पोहोचेपर्यंत प्रवाशांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे रस्त्यांवरील खड्डे.

मुळच्या अलिबागच्याच असलेल्या ‘जय मल्हार’ फेम अभिनेता देवदत्त नागे याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन यासंबंधीची पोस्ट केली आहे. ‘अलिबागला जाताना रस्त्यांची रुंदी वाढवण्याचं काम सुरु असलं तरीही काही रस्ते मात्र अद्यापही दुर्लक्षितच आहेत. विद्यानगर, मुरुड बायपास रोड अशा रस्त्यांवर फार खड्डे असल्यामुळे प्रवाशांचा वाहने चालवताना बरेच अडथळे येत आहेत’, असं देवदत्त ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या माहितीत म्हणाला. किंबहुना सर्वसामान्य नागरिक म्हणून हीच व्यथा त्याने फेसबुक अकाऊंटवरुनही मांडली आहे. ‘रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कधीकधी अनेकांची वाहनं बंद पडतात, लहान मुलांना, महिलांना ये- जा करण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामन करावा लागतो. त्यातही अपघाताची भीती असते ती वेगळीच’, असं म्हणत देवदत्तने रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल खंत व्यक्त केली.

Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

अलिबाग आणि आसपासच्या परिसरात बऱ्याच रस्त्यांची अशी दुरावस्था झाली असून स्थानिकांना याचा जास्त फटका बसत आहे. खुद्द देवदत्तलाही दोन तासांच्या प्रवासासाठी फक्त या ‘खड्ड्यातील रस्त्यांमुळे’ चार ते साडेचार तास खर्ची घालावे लागले असल्याचं त्याने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या माहितीत सांगितलं. ‘रस्ता दुरुस्तीचं काम करण्याची मागणी करत अनेकांच्या समस्या संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न असून, जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात’, असंही तो म्हणाला. ‘माझा कोणावरही राग नाही. मला राजकारण कळतही नाही. पण, अलिबाग सुंदर आहे आणि ते असंच सुंदर ठेवण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे’, असंही त्याने स्पष्ट केलं.

वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?

देवदत्तच्या या पोस्टला सध्या चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनीच अलिबागमधील खड्ड्यांसोबतचे त्यांचे सेल्फी ‘आय लव्ह माय अलिबाग’ म्हणत पोस्ट केले आहेत. आपल्या एका पोस्टला मिळालेला हा प्रतिसाद पाहून निदान आतातरी रस्त्यांची सुधारणा होईल अशी आशा देवदत्तने व्यक्त केली आहे. एक आघाडीचा अभिनेता, सच्चा अलिबागकर आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देवदत्तच्या या पोस्टकडे संबंधितांचं लक्ष जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.