बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी अर्थात जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. कधी ती बॉलिवूमधील पदार्पणामुे चर्चेत असते, तर कधी कथित प्रियकर शिखरमुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. बॉलिवूड वर्तुळातील मुलींच्या वावरण्यावर निर्बंध आणण्यासाठी श्रीदेवीने नुकतेच त्यांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याचे समोर आले होते. आपल्या आईच्या आदेशाचे पालन करत जान्हवी सध्या सोशल मीडियावर ऑफलाइन आहे. मात्र एका दिवसापूर्वीच जान्हवीचे पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून दर्शन झाले आहे. जान्हवी सध्या इनस्टाग्रामवर सक्रिय नसली तरी पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मनीष मल्होत्राने जानव्हीचा एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी कथित प्रियकर शिखर पहारियासोबत नृत्य करताना दिसत आहे. जान्हवीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लाल रंगाचा लहिंग्यामध्ये जान्हवी धमाकेदार ठुमके लगावताना दिसत आहे. श्रीदेवी मुलींच्या संदर्भात नेहमीच सजग असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी श्रीदेवीने स्वत: आपल्या मुलीचा फोटो शेअर केला होता. मात्र त्यानंतर तिने दोन्ही मुलींना सेल्फी सवय बंद करण्यास सांगितले होते. सध्याच्या घडीला तिच्या मुली रुपेरी दुनियेच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरताना दिसत आहेत. जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून अशा चर्चा रंगत आहेत की, जान्हवी कपूर लवकरच ‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार असल्यामुळे सध्या अनेकांच्याच नजरा या आगामी चित्रपटाकडे लागल्या आहेत. चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरीही ‘आर्ची’च्या भूमिकेसाठी जान्हवीचे नाव पुढे येत आहे. याआधी बॉलिवूडच्या बऱ्याच कार्यक्रमांना श्रीदेवीसह तिची मुलगी जान्हवी दिसायची. पण हल्ली मात्र असे होत नाही. जान्हवीला अभिनेत्री म्हणून पाहण्यासाठी रसिकांमध्ये उत्सुकता वाढावी यासाठी श्रीदेवीने ही शक्कल लढवल्याची देखील चर्चा रंगली होती.

जान्हवी नेहमीच नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यासोबतच्या फोटोमुळे चर्चेत राहिली आहे. जान्हवीला स्टाइल आणि फॅशन तिच्या आईकडूनच (श्रीदेवी) मिळाली आहे. श्रीदेवीने शेअर केलेल्या फोटोमध्ये जान्हवी वडिल बोनी कपूरसोबत दिसली होती. तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक सेल्फी पाहायला मिळतात. चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती.