‘मोहब्बते’ सिनेमाचा अभिनेता जिमी शेरगिल याला पडद्यावर चांगली मुलगी मिळत नाही. प्रत्येक सिनेमात त्याला आवडणारी मुलगी दुसरेच कोणीतरी घेऊन जाताना दिसते. त्यामुळे आता असं ऐकू येत आहे की जिमी शेरगिल आपली नवरी शोधण्यासाठी चक्क ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेच्या सेटवर गेला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भाभी जी घर पर है’ आठवड्याच्या विशेष भागात विभूति म्हणजे (आसिफ शेख) स्वतःचे विवाह मंडळ सुरू करतो, जिकडे जिमी स्वतःला एखादी चांगली मुलगी शोधण्यासाठी येतो. या भागात जिमी शेरगिल त्याच्या ‘तनु वेड्स मनु’च्याच व्यक्तिरेखेमध्ये दिसणार आहे. त्याची या व्यक्तिरेखेची ही व्यथा असते की, त्याला जी मुलगी आवडते ती मुलगी लग्नाच्या दिवशीच पळून जाते.

या भागात विभूती त्याच्या या अडचणीवर उपाय देताना दिसणार आहे. पण शेवटी परत काही ना काही गडबड होते जेव्हा जिमीला कळते की ज्या मुलीची त्याने निवड केली आहे, तिचे दुसऱ्याच एका मुलावर प्रेम आहे आणि तिही तिच्या प्रियकरासोबत पळून जाते.

आसिफ शेखने सांगितले की, ‘जिमीसोबत या भागाचे चित्रिकरण करणे खूप मजेशीर होते. तो एक उत्तम अभिनेता आहे.’ या भागात जिमीने अवस्थीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

‘भाभी जी घर पर है’ या मालिकेचे प्रसारण अॅण्ड टीव्हीवर होते. या मालिकेत सौम्या टंडन, रोहिताश गौड आणि शुभांगी अत्रे यांची मुख्य भूमिका आहे.