बच्चन यांच्या आठवणी आणि फिरक्यांमुळे ‘मामि’ची आरंभसंध्या चमकली

मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासात आणि विशेषत: भारतीय चित्रपटाच्या शतकी वाटचालीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या ‘रॉयल ऑपेरा हाऊस’ ही १०४ वर्षे जुनी वास्तू पुन्हा एकदा सिने तारे-तारकांच्या चमचमत्या चांदण्याने झळाळून उठली. गेली २३ वर्षे बंद असलेले ‘रॉयल ऑपेरा हाऊस’ नूतनीकरणानंतर त्याच दिमाखात १८ व्या ‘जियो स्टार मामि चित्रपट महोत्सवा’च्या शुभारंभाच्या निमित्ताने रसिकांसाठी खुले झाले. वैशिष्टय़ म्हणजे या राजेशाही भव्य वास्तूत, आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्याच्या निमित्ताने प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनी ‘सूर निरागस हो..’ हे मराठमोळे गाणे गाऊन शुभारंभाची संध्याकाळ सूरमयी केली.

stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
Sensex Hits Record, High, 75 thousands Points, Nifty Touches 22753 Points, sensex nifty high, share market, stock market, finance, finance knowledge, finance article, share market high, stoke markte high, marathi news,
सेन्सेक्स प्रथमच ७५ हजारांवर विराजमान
Drug supply to Delhi
अमली पदार्थ प्रकरणातील शोएबकडून दोनदा दिल्लीस कोट्यवधींचा पुरवठा
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

दिवाळीचा हा आठवडा मुंबईकरांसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपटांची पर्वणी घेऊन आला आहे. तुर्की चित्रपटांचा खास आठवडा, भारतीय चित्रपट दिग्दर्शकांच्या अनेक नवीन, अप्रदर्शित कलाकृती, मराठीतील सर्वोत्तम चित्रपट, मुंबई शहरावरचे लघुपट, लहान मुलांना वेड लावणारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट, फ्रेंच क्लासिक्स असा खजिना घेऊन आलेल्या ‘मामि’ चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ गुरुवारी संध्याकाळी झाला. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला, मात्र त्यानिमित्ताने ‘रॉयल ऑपेरा हाऊस’च्या दिमाखदार वास्तूत उभे राहून बोलताना आठवणी आणि फिरक्यांची आतषबाजी करत त्यांनी ही संध्याकाळ अविस्मरणीय केली.

१९५० साली चित्रपटात काम करण्यासाठी अलाहाबादहून मुंबईत आल्यानंतर गौतम सिंघानिया यांच्या आजोबांकडे आपला मुक्काम होता, असे त्यांनी सांगितले. मुंबईत आल्यानंतरच्या पहिल्या काही दिवसांतच सिंघानिया यांच्या आग्रहावरून ‘रॉयल ऑपेरा हाऊस’च्या बॉक्समध्ये बसून पहिला चित्रपट पाहिला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.

मी सर्वाच्या आधी इथे आलो..

काम आणि वेळेच्या बाबतीत परफेक्शन सांभाळणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी शुभारंभाचा सोहळा उशिराने सुरू झाल्याबद्दल आयोजकांची चांगलीच फिरकी घेतली. ‘मामि’च्या आयोजकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांच्या खास आग्रहावरून आणि त्यातील सातत्यामुळे आपण या मंचावर उपस्थित झाल्याचे त्यांनी सांगितले. अनुपमा चोप्रा या निर्माता-दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या पत्नी आहेत. खुद्द अमिताभ आणि विधू विनोद चोप्रा यांची मैत्रीही सर्वश्रुत आहे. त्यामुळे आठ महिने आधीपासून आपल्याला या सोहळ्यात येण्यासाठी आग्रह करणाऱ्या अनुपमा यांचा शब्द त्यांच्या पतीलाही टाळता आला नसावा.. त्यामुळे सोहळ्याच्या दिवशी सकाळी चक्क विधू विनोद चोप्रांनी आपल्याला फोन करून सोहळ्याला येत असल्याची खातरजमा करून घेतल्याची मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. आपण सगळ्यात आधी आणि वेळेवर इथे उपस्थित होतो, याची खास जाणीवही त्यांनी आयोजकांना करून दिली.