रोमान्स आणि कॉ़मेडीचा परफेक्ट तडका असलेल्या वरुण धवनच्या ‘जुडवा २’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. साधाभोळा ‘प्रेम’ आणि खोडकर ‘राजा’ या दोन्ही भूमिका वरुण धवन या चित्रपटात साकारणार आहे. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खान आणि करिष्मा कपूरच्या ‘जुडवा’ चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. त्याचाच हा दुसरा भाग असून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात हा चित्रपटही कमी पडणार नाही हे ट्रेलर पाहून म्हणता येईल.

या चित्रपटात करिष्मा कपूर आणि रंभाच्या जागी जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू भूमिका साकारणार आहेत. दोघींचाही यामध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. आपल्या ग्लॅमरसाठी ओळखल्या जाणाऱ्या या दोघींचा अनोखा आणि आकर्षक लूकदेखील चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. या ट्रेलरमध्ये अभिनेता आणि कॉमेडीयन अली असगरही दिसतोय.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

सलमानचा ‘जुडवा’ चित्रपट यशस्वी होण्यामागे त्यातील गाण्यांचा मोठा वाटा आहे. त्या चित्रपटातील ‘उंची है बिल्डिंग’ आणि ‘टन टना टन’ ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. हेच लक्षात घेऊन ‘जुडवा २’ मध्ये या दोन्ही गाण्यांचे रिमेक करण्यात आले आहेत. ट्रेलरमधील काही दृश्य पहिल्या भागातून जसेच्या तसे कॉपी केल्याचेही पाहायला मिळते. ही दृश्ये पाहून पुन्हा एकदा सलमान खानचा ‘जुडवा’ चित्रपट पाहण्याचीच इच्छा होते.

वाचा : ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकारांना मिळते इतके मानधन?

१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’च्या दुसऱ्या भागाचेही दिग्दर्शन डेविड धवन यांनीच केले आहे. तेव्हा आता २० वर्षांनंतर हा चित्रपट ‘जुडवा’ इतकाच यशस्वी होईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. २९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.