दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मी राय तिचा आगामी ‘जूली २’ या सिनेमामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताच ‘जूली २’ चा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमधील तिचा बोल्ड अंदाज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की लक्ष्मी राय ही एमएस धोनीची पूर्वाश्रमीची प्रेयसी आहे.

दोन मुलांचा पित्या असलेल्या अभिनेत्यासोबत कंगनाला करायचे होते लग्न?

लक्ष्मी राय हे नाव तुम्हाला आता कदाचित नवीन वाटत असलं, तरी ती याआधीही अनेकदा चर्चेत आली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे ती चर्चेत आली होती. त्या दोघांमध्ये ब्रेकअप झाले असले तरी आजही तिला याबाबतीत प्रश्न विचारले जातात. ‘जूली २’ च्या प्रमोशनमध्ये तिला हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तिचे आणि धोनीचे असलेले नातेसंबंध.

काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मीने धोनी प्रकरणावर भाष्य केले. आपल्या नातेसंबंधांबद्दल बोलताना तिने सांगितले की, ‘माझा भुतकाळ पुनः पुन्हा उकरुन का काढला जातो? माझ्यावर लागलेला हा एक कलंक असल्याचे मला आता वाटते. मला आता कळून चुकले आहे की माझे धोनीसोबतचे नाते हे एका डागाप्रमाणे आहे. एक असा डाग जो लवकर जाणार नाही.’

आयपीएल सामन्यांदरम्यान लक्ष्मी आणि धोनीची ओळख झाली होती. सुरेश रैनासोबत धोनी तिच्या वाढदिवसालाही गेला होता. त्यानंतर त्यांचे डेटींग सुरू झाले. यादरम्यान त्यांचे प्रकरण फार गाजले होते. मात्र अनेक नात्यांप्रमाणे त्यांच्या नात्यातही मतभेद आले आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला २००९ मध्ये लक्ष्मी आणि धोनी वेगळे झाले. त्यानंतर २०१० मध्ये धोनीने साक्षीशी लग्न केले. धोनीच्या लग्नानंतर लक्ष्मीसाठी हे नाते संपूर्णपणे संपले होते. पण प्रसारमाध्यमांसाठी ते कदाचित संपले नाही. म्हणूनच की काय तिला धोनीशी निगडीत एखादा तरी प्रश्न तिला विचारला जातो.