दुधाचा अभिषेक असो किंवा मग पोस्टरची केलेली पुजा असो विषय जर सुपरस्टार रजनीकांत यांचा असेल तर रसिकांच्या रसिकतेला एक प्रकारचे उधाणच येते. जगभरात एका वेगळ्याच ख्यातीने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता रजनीकांत यांच्या ‘कबाली’ चित्रपटाने जगभरातल्या जवळपास सर्वच चित्रपट गृहांमध्ये धुमाकुळ घातला आहे. ‘थलाइवा’ रजनीकांतने साकारलेल्या भूमिकेप्रमाणे आता त्यांच्या दाढीचा आणि त्यांच्या वेशभूषेचा वेगळाच ट्रेंडही आता मूळ धरू पाहात आहे. पहाटे च्या ‘शो’पासून मोबाइलच्या कव्हरवरही सर्वत्रच रजनीमय वातावरणात चाहत्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे.
पीए. रंजिथ दिग्दर्शित ‘कबाली’ या चित्रपटात रजनीकांत एका मलेशियन डॉनची भूमिका साकारत आहे. विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांनीही चांगल्या प्रतिक्रिया दिल्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत चित्रपटगृहातून ‘कबाली’ची हवा इतक्यात जाणारी वाटत नाही. एकिकडे या चित्रपटाची विक्रमी कमाई होत असताना मराठीतही रजनीकांतच्या ‘कबाली’चा प्रवेश झाला आहे. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर ‘बिईंग महाराष्ट्रीयन’ तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘कबाली’ला अस्सल मराठी साज चढवण्यात आला आहे. ‘माईंड इट अॅन्ड शेअर इट’ असे म्हणत ‘बिईंग महाराष्ट्रीयन’ने प्रसिद्ध केलेला मराठीतल्या ‘कबाली’ व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर बराच गाजत आहे.

arun govil and dipika chikhlia from the Ramayana
‘रामायण’ मालिकेतील राम-सीतेची जोडी ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार, जाणून घ्या…
Bhagyashree Mote separated from vijay palande
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”
ashish patil started new dance studio
स्वप्न सत्यात उतरलं! ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सुरू केला स्वत:चा डान्स स्टुडिओ! वास्तुपूजनाचा व्हिडीओ केला शेअर
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित