बॉलिवूडमध्ये मैत्री फार काळ टिकत नाही म्हणतात. पण यातला फोलपणा काजोल, शाहरुख आणि करण जोहरने आतापर्यंत दाखवून दिला होता. पण या त्रिकुटाच्या मैत्रीलाही कोणची तरी दृष्ट लागली असेच म्हणावे लागेल. या त्रिकुटाने एकत्र असे ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ असे एकाहून एक हिट सिनेमे दिले. पण नंतर त्यांच्यात काही कारणांमुळे दुरावा निर्माण झाला. अजय देवगणचा ‘शिवाय’ आणि करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित झाला. सिनेमाच्या प्रदर्शनावेळी अजय आणि करण यांच्यातील वाद प्रकर्षाने जाणवले. त्यातून आता काजोल आणि करणची २५ वर्षांची मैत्रीही पूर्वीसारखी राहिली नसल्याचे दिसले. नुकत्याच एका पत्रकार परिषदेत काजोलने करणसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं. यापुढे करणच्या सिनेमात आपण काम करणार नसल्याचे काजोल म्हणाली.

सनी लिओनीच्या मुलीने उच्चारलेला पहिला इंग्रजी शब्द!

‘व्हीआयपी २’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना तिने थेट उत्तर देणं टाळलं असलं तरी मला ज्यांच्यासोबत काम करताना कम्फर्टेबल वाटतं मी त्यांच्यासोबतच भविष्यात काम करणार असं उत्तर तिने दिलं.

सिनेमात काम करताना एकमेकांमध्ये चांगला संवाद असणं फार आवश्यक आहे. सिनेमा करताना तुम्ही जर एकमेकांशी बोलतच नसाल तर एकत्र काम कसं करणार असा प्रश्न तिने यावेळी उपस्थित केला. यावरुनच तिने भविष्यात करणसोबत काम न करण्याचे संकेत दिले. करणने त्याच्या आत्मचरित्रातही काजोल आता त्याच्या आयुष्याचा भाग नसल्याचे स्पष्ट केले होते.

नुकताच व्हिआयपी २ सिनेमाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ‘वंडरबार फिल्म्स’ची निर्मिती असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमधून काजोलचा कधीही न पाहिलेला मॉडर्न कॉर्पोरेट लूक पाहायला मिळत आहे. त्यासोबतच संवाद हे या ट्रेलरची जमेची बाजू ठरत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्यासाठी सुरु असणारी ओढाताण, आपलं आणि कंपनीचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी न्यू कमर्सवर एखादी बॉस कशा प्रकारे नियंत्रण ठेवत असेल याचं चित्रण काजोलच्या भूमिकेतून पाहायला मिळतं.

महिन्यात फक्त १५ दिवस काम करतात शिवाजी साटम, पण त्यांचे मानधन वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

सिनेमाची कथा आणि संवाद धनुषने लिहिले असून, सौंदर्या रजनीकांतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. धनुष आणि काजोलच्या अभिनयाची जुगलबंदी या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘व्हीआयपी’ या ब्लॉकबस्टर सिनेमाचा ‘व्हीआयपी २ ललकार’ हा सिक्वेल आहे. तेव्हा आता हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.