बॉलीवूडमध्ये चित्रपटाच्या प्रसिद्धीची पद्धत हळूहळू बदलत चालली आहे. आगामी बार बार देखो या चित्रपटाची प्रसिद्धी काहीशा वेगळ्या पद्धतीने केली जातेय. एक्सेल एन्टरटेन्मेन्ट आणि धर्मा प्रोडक्शन यांनी प्रसिद्धीचा वेगळा मार्ग स्वीकारत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी यातील काही गाण्यांचे टीझर प्रदर्शित केले. या गाण्यांमधील काला चष्मा गाण्याच्या टीझरने चांगलीच हवा तयार केले आहे. कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही वेगळी जोडी या गाण्याद्वारे पाहता येणार असल्याने त्याबाबत चर्चा केली जात आहे.  या दोघांवर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे २७ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
रॅपर बादशाहने काला चष्मा गाण्यास संगीतबद्ध केले असून त्यास अमर आर्शी, बादशाह आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे. अमर आर्शीच्या १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘तेनु काला चष्मा जजता वे’ या सुप्रसिद्ध पंजाबी गाण्याचा हा रिमेक आहे. तर गाण्याची कोरिओग्राफी बोस्को-सिझर यांनी केली आहे.