तुम्हाला २००० मध्ये आलेल्या ‘कलियो का चमन’ हे गाणे आठवते का? या गाण्यातील अभिनेत्रीने तेव्हा साऱ्यांचीच मने जिंकली होती. ही अभिनेत्री भविष्यात खूप नाव कमावेल असे अनेकांना वाटत होते. पण तसे काही झाले नाही. अभिनेत्री मेघना नायडू अगदी अल्पावधीतच विस्मृतीत गेली.

https://www.instagram.com/p/BZNUgTHgALx/

मध्य प्रदेशमधील विजयवाडा येथे मेघनाचा जन्म झाला. सिनेमात जरी ती फारशी सक्रीय नसली तरी सोशल मीडियाद्वारे ती प्रेक्षकांना भेटत असते. हिंदी सिनेमांसह तिने काही कन्नड आणि तेलगू सिनेमातही काम केले. २००४ मध्ये मेघनाने हवस या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘एके ४७’, द मनी गेम’, ‘क्रश’, ‘पाऊस’, ‘ ‘माशूका’, ‘रेन’, ‘ऐटः द पावर ऑफ शनि’, ‘रिवाज’, ‘इश्क दीवाना’ अशा सिनेमांमध्ये ती दिसली. पण हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट झाले नाही. बॉलिवूडसह ती दक्षिणेतील चित्रपटांमध्येही झळकली. सिनेमात यश न मिळाल्यामुळे तिने आपले लक्ष छोट्या पडद्यावर केंद्रीत केले. ती ‘खतरों के खिलाडी’, ‘जोधा अकबर’, ‘अदालत’ और ‘ससुराल सिमर का’ या टीव्ही शो मध्येही दिसली होती.

मेघना इतर सोशल साईटपेक्षा इन्स्टाग्रामवर फार सक्रिय आहे. आपल्या दिवसभरातील अनेक गोष्टींची माहिती ती आपल्या चाहत्यांना सतत देत असते. मेघना तिचा जास्तीत जास्त वेळ मुंबई, गोवा आणि दुबई येथे फिरण्यात घालवते.