विनोदवीर कपिल शर्मा हे टिव्ही जगतातलं नावाजलेलं नाव आहे. त्याचा शो ‘द कपिल शर्मा शो’ला चांगलाच टीआरपी आहे. कपिल आपल्या नावावरच त्या शोला नंबर एकपर्यंत घेऊन गेला आहे. यामुळेच त्याला या शोसाठी सगळ्यात जास्त मानधन मिळत आहे.
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की, कपिलची महिन्याभराची कमाई एवढी आहे जेवढी बॉलिवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्रींनाही मिळत नाही. आलिया भट्ट, परिणीती चोप्रा आणि श्रद्धा कपूर या अशा अभिनेत्री आहेत ज्या वर्षाला एकच सिनेमा करतात. ट्रेंड एनालिस्टनुसार, आलिया भट्टला एका सिनेमासाठी चार ते पाच कोटी रुपये मिळतात. तर श्रद्धा कपूरला तीन ते चार कोटी रुपये मिळतात. परिणीतीलाही एका सिनेमासाठी सुमारे दोन ते तीन कोटी रुपये मिळतात. एवढंच नाही तर टायगर श्रॉफ आणि आदित्य रॉय कपूरलाही एका सिनेमासाठी सहा कोटी रुपये मिळतात.
तर एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल शर्माला ‘द कपिल शर्मा’ शोसाठी सरासरी दिवसाला ६० ते ८० लाख रुपये मिळतात. याशिवाय तो जाहिरातीतही दिसतो. त्यामुळे जाहिरात क्षेत्रातूनही त्याला चांगली मिळकत मिळते. कपिल शर्मा महिन्याला सुमारे १५ ते २० कोटी कमवतो, अशी माहिती समजते. जेवढे कपिल शर्माची मिळकत आहे तेवढे वर्षाला एक सिनेमा करणाऱ्यांनाही एवढे मानधन मिळत नाही. दरम्यान, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
२०१४-१५ मध्ये कपिल शर्माने आपल्या मानधनात वाढ केली होती. त्यामुळे एकीकडे शोची टीआरपी वाढत असताना दुसरीकडे कपिलचे मानधनही त्याच वेगात वाढत आहे. सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्यांमध्ये कपिल शर्मानंतर सुनील ग्रोवरचा क्रमांक लागतो.