ए दिल है मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वादावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यात मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून काढलेला तोडगा ही भयंकर मोठी चूक असल्याची प्रतिक्रिया अभिनेता फरहान अख्तर याने व्यक्त केली आहे. हा प्रकार अत्यंत दुर्देवी असून त्यामुळे चुकीचा पायंडा पाडला गेला आहे, असे फरहान अख्तरने सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा नवा डाव, शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेशी ‘डील’

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा समावेश असलेल्या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाला विरोध दर्शवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे आणि करण जोहर यांना वर्षा बंगल्यावर बोलवून यशस्वी मध्यस्थी केली होती. यावेळी राज यांनी पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांना प्रायश्चित म्हणून सैनिक कल्याण निधीत पाच कोटी रूपये जमा करण्याची प्रमुख अट घातली होती. निर्मात्यांनी ही अट मान्य केल्यानंतर मनसेचा ‘ऐ दिल है मुश्किल’ला असणारा विरोध मावळला होता. मात्र, या सगळ्या प्रकारावर फरहानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही काय करावे किंवा करू नये, हे सरकारही तुम्हाला सांगू शकत नाही. मग तुम्ही कोणाचे ऐकत आहात? तुम्हाला हिंसेचा धाक दाखवून घाबरवणाऱ्या लोकांचे तुम्ही ऐकत आहात. हिंसेचा धोका हा फक्त तुम्हालाच नाही. तुमच्या घरातील मुलांना आणि कुटुंबियांनाही आहे. तुम्ही त्यांना या सगळ्यात का खेचत आहात? सरतेशेवटी हा सर्व प्रकार दुर्देवी आहे, फरहानने म्हटले आहे. यावेळी फरहान अख्तरने भारत-पाक मुद्द्यावरून केवळ चित्रपटसृष्टीलाच लक्ष्य करण्याच्या भूमिकेवरही टीका केली. आम्ही तुम्हाला कायदे करण्यासाठी निवडून देतो. मात्र, हे कायदे केवळ चित्रपचसृष्टीलाच लावू नका. एवढेच असेल तर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार का थांबवला जात नाही, असा सवालही फरहान अख्तरने उपस्थित केला.
बॉलीवूड विश्व राजकारणाला घाबरलेय- अजय देवगण