करण जोहरचे सुरुवातीचे सिनेमे हे कौटुंबिक सिनेमे मानले जायचे. करणचा सिनेमा येणार म्हणजे प्रेक्षक सहकुटुंब सिनेमागृहात जायचे. करणने त्याच्या ‘अॅन अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करताना अनेक गोष्टी प्रसारमाध्यमांसोबत शेअर केल्या.

करण यावेळी म्हणाला की, ‘जेव्हा ‘कभी अलविदा ना कहना’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा तो परदेशात एका चित्रपटगृहात हा सिनेमा पाहत होता. पण जेव्हा त्या सिनेमात शाहरुख आणि राणीचा एक प्रेमाचा सीन दाखवला जात होता तेव्हा एक जोडप्याला हे कदाचित एखाद्याच्या स्वप्नातलं दाखवत असतील असे वाटले. पण जेव्हा त्यांना कळले की हे स्वप्न नसून तसेच घडत आहे तेव्हा ते त्यांना सहन झाले नाही आणि ते लगेच चित्रपटगृहातून निघून गेले.’ करणला त्या दिवशी जाणवले की, कसे प्रेक्षक स्वतः ला त्याच्या सिनेमांसोबत बांधून घेतात.

‘अॅन अनसुटेबल बॉय’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना त्याने संपूर्ण सिनेसृष्टीला आपण आपले घरच मानतो असे सांगितले. तसेच त्याच्या आयुष्यात शाहरुख खानला फार महत्त्व असल्याचेही त्याने सांगितले आहे. त्यामुळे ‘अॅन अनसुटेबल बॉय’ या त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन करणने शाहरुखच्याच हस्ते केले.

दरम्यान, या पुस्तकात करणने पहिल्यांदाच सेक्सविषयी न कचरता भाष्य केले असून पहिल्या लैगिक अनुभवासाठी त्याने पैसे दिल्याचे म्हटले आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाचा दिग्दर्शक करण जोहर याने वयाच्या २६ व्या वर्षी त्याची व्हर्जिनिटी गमावली होती. त्याच्या या अनुभवाबद्दल त्याने नेहा धुपियाच्या नो फिल्टर नेहा या शोमध्येही सांगितले होते. त्याने पुस्तकाल लिहलंय की, पहिल्यांदा जेव्हा त्याने पैसे दिले तेव्हा त्याने काहीच केले नाही. त्यानंतर जवळपास आठवड्यानंतर त्याने हा अनुभव घेतला आणि या अनुभवाने तो अजिबात खूश नव्हता. करणने लिहलं की, हे तुम्हाला मुर्खपणाचे वाटेल. कदाचित यात काहीच तथ्य नाही असेही वाटेल. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तिला तुम्हाला आनंद मिळावा म्हणून पैसे देता. तेव्हा ती व्यक्ती तुमच्यावर कृत्रिम प्रेम करत असते. त्यातून तुम्हाला समाधान मिळणे अशक्य असते.