निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेहमीच त्याच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकतो. प्रेम, प्रेमभंग, मैत्री यांसारख्या विविध भावभावनांना एका वेगळ्या नजरेतून प्रेक्षकांसमोर सादर करत करणने नेहमीच रसिकांची दाद मिळवली आहे. चित्रपटांच्या माध्यमातून व्यक्त होणारा करण अनेक परिसंवादांमध्ये आणि विविध कार्यक्रमांमध्ये ज्यावेळी हजेरी लावतो त्यावेळी तो कधीच स्वत:च्या खासगी बाबी लपवून ठेवत नाही. आपण गे असल्याचा खुलासाही त्यानी याआधी केला आहे. करण जोहरने त्याच्या आत्मचरित्रपर पुस्ताकामध्ये स्वत:विषयीच्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यासोबतच करणने त्याच्या आणि इतर काही कलाकारांसोबतच्या त्याच्या नात्याविषयीसुद्धा लिहिले आहे. ‘अॅन अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्रपर पुस्कतामध्येही करणने त्याच्याबद्दलच्या काही गोष्टींचा उलगडा केला आहे.

अभिनेत्री काजोलसोबत असलेल्या मतभेदांविषयीही करणने या पुस्तकात लिहिले आहे. सध्या ‘केजो’च्या पुस्तकातील म्हणजेच त्याच्या जीवनातील आणखीन एक पान सर्वांसमोर आले आहे. ‘इंडिया टुडे’ या संकेतस्थळाने करणच्या आत्मचरित्रपर पुस्तकातील काही माहिती दिली होती. त्यानुसार, पुस्तकात करणने त्याला पहिल्या लैंगिक अनुभवासाठी पैसे दिल्याचा खुलासा केला. करणने पहिल्यांदाच सेक्सविषयी न कचरता भाष्य केले असून पहिल्या लैंगिक अनुभवासाठी त्याने पैसे दिल्याचे म्हटले होते. ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर याने वयाच्या २६ व्या वर्षी त्याची व्हर्जिनिटी गमावली होती. त्याच्या या अनुभवाबद्दल त्याने नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्येही सांगितले होते. त्याने पुस्तकाल लिहलंय की पहिल्यांदा जेव्हा त्याने पैसे दिले तेव्हा त्याने काहीच केले नाही. त्यानंतर जवळपास आठवड्यानंतर त्याने हा अनुभव घेतला आणि या अनुभवाने तो अजिबात खूश नव्हता. करणने लिहलेय की, हे तुम्हाला मुर्खपणाचे वाटेल. कदाचित यात काहीच तथ्य नाही असेही वाटेल. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तिला तुम्हाला आनंद मिळावा म्हणून पैसे देता. तेव्हा ती व्यक्ती तुमच्यावर कृत्रिम प्रेम करत असते. त्यातून तुम्हाला समाधान मिळणे अशक्य असते.

या पुस्तकातील काही भागामध्ये करणने आपल्या गे असल्याच्या प्रश्नावरुनही पडदा उचलला. करणच्या म्हणण्यानुसार, ‘सर्वांनाच माझे सेक्शुअल ओरिएन्टेशन ठाऊक आहे. ते मला इतरांना आरडाओरडा करुन सांगण्याची गरज नाही. आणि जर का त्याविषयी मी काही बोलायचे म्हटले तरीही मी ते करु शकत नाही. कारण, आपण ज्या देशात राहतो तेथे मला जेलमध्ये जावे लागेल. म्हणूनच मी करण जोहर ते तीन शब्द बोलणार नाही जे इतरांना ठाऊकच आहेत.