टेलिव्हीजन विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे निखिल चिन्नप्पा. विविध रिअॅलिटी शो आणि कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणाऱ्या निखिल चिन्नप्पाची आणखी एका कार्यक्रमासाठी वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘रोडिज’ या रिअॅलिटी शोच्या ऑडिशनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये करण कुंद्रा एका स्पर्धकाच्या कानशिलात लगावताना दिसत आहे.

‘रोडिज राइझिंग’ या शोच्या ऑडिशनदरम्यान दोन स्पर्धकांवरील राग अनावर झाल्यामुळे करणने त्या स्पर्धकाच्या अंगावर धावून जात त्यापैकीच एका स्पर्धकाच्या कानशिलात लगावली होती. सदर घटनेनंतर काही दिवसांनी या कार्यक्रमासाठी करणच्या जागी निखिल चिन्नप्पाची वर्णी लागल्याची चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. पण, करण कुंद्राच्या व्यग्र वेळापत्रकामुळे आणि त्याच्या कामामुळे या कार्यक्रमाची सूत्रे निखिल चिन्नप्पा सांभाळताना दिसणार आहे. म्हटले जात आहे. पण, ‘रोडिज राइझिंग या कार्यक्रमातील प्रवास दौऱ्यांच्या तारखा आणि करणने काही कामांसाठी दिलेल्या शब्दामध्ये समतोल राखता येत नसल्यामुळे या कार्यक्रमात त्याच्या जागी निखिल चिन्नप्पा झळकणार आहे’, असे एमटिव्ही या वाहिनीशी संलग्न असणाऱ्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/BQt5Nrhjjxx/

https://www.instagram.com/p/BN6JC_VABwk/

निखिल चिन्नप्पाची लोकप्रियता पाहता त्याचा ‘रोडिज’चा टीआरपी वाढवण्यासाठी त्याची मदत होऊ शकते ही बाब नाकारता येणार नाही. ‘रोडिज’ या शोचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये रणविजय सिंघा, नेहा धुपिया प्रिन्स नरुला आणि हरभजन सिंग हे प्रसिद्ध चेहरे टीम लिडर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, सळसळत्या रक्ताच्या तरुणाईचा उत्साह, समयसूचकता, चालू घडामोडींबद्दल त्यांना असणारी माहिती आणि एकंदर रोडिजचा किताब पटकावण्यासाठी असणारे वेड या साऱ्याचा मेळ रोडिज या कार्यक्रमात पाहायला मिळतो. गेल्या कित्येक वर्षांपासून रोडिज हा क्रार्यक्रम चाहत्यांना चांगलीच भुरळ घालत आहे.

roadies-759