करिना कपूर खान लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. करिना आणि सैफ त्यांच्या या बाळाचे स्वागत करायला सज्जही झाले आहेत. त्यांच्या या आनंदात करिनाची सासू म्हणजे शर्मिला टागोरही आनंदी आहेत. त्या आपल्या सुनेची काळजी तर घेतच आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की बेबो कशाप्रकारे स्वतःची काळजी घेते आणि प्रत्येकक्षण आनंदाने जगण्याकडे तिचा कल असतो.

त्या म्हणाल्या की, करिना खरंच खूप प्रेमळ आहे. ९ महिन्यांचा हा काळ तिने फार एन्जॉय केला. तिचा प्रत्येकक्षण मनमुरादपणे जगण्याकडे कल असतो. या तिच्या काळात तिला कोणाचीही दृष्ट लागू नये असंच मला वाटतं. ती मस्त तयार होते, बाहेर फिरायला जाते. जेवढं नैसर्गिक गोष्टी करता येतील तेवढ्या करण्याकडे तिचा कल असतो. तिच्यातल्या याच गोष्टी तिला अधिक सुंदर बनवतात.

या वर्षाची सुरुवात टायगर यांच्या जयंतीने झाली. आम्ही एका चांगल्या क्रिकेट मॅचचे आयोजन केले होते. आता वर्षाच्या शेवटी करिना आणि सैफच्या बाळाचे आगामन होईल. परत एकदा आजी व्हायला मीही उत्सुक आहे. त्यामुळे नवीन वर्षाकडे मी फार सकारात्मकतेने पाहते आहे.

दरम्यान, आपल्या मनमिळाऊ आणि खोडकर स्वभावाने अनेकांच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता करिना कपूरचा मोठा चाहता होता असे त्याने म्हटले होते. एका वृत्तवाहिनीतर्फे नुकतेच आयोजित केलेल्या टॉक शो मध्ये रणवीरने त्याच्या आणि करिनाच्या पहिल्या भेटीबद्दलचा किस्सा सांगितला होता. ‘करिनाला भेटल्यावर माझे डोळे तिच्यावरच स्थिरावले होते. ती माझी आवडती अभिनेत्री होती. पण, त्यावेळी मी तिला पाहताच जरा जास्तच व्यक्त होत माझे भाव व्यक्त करत असताना त्यामध्ये अतिशयोक्तीच होती’, असे रणवीर म्हणाला होता.