‘उडता पंजाब’मधील आलिया भटच्या अभिनयाने चित्रपटातील तिचे सह-कलाकार भलतेच प्रभावित झालेले दिसतात. शाहीदनंतर करिना कपूरनेदेखील तिच्या अभिनयाचे कौतुक केले. चित्रपटातील आलियाच्या उत्तम अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा, असे आपल्याला वाटते असल्याचे करिनाने म्हटले आहे. तसे पाहायला गेले तर पुरस्कारापेक्षा मी चाहत्यांचे प्रेम आणि त्यांनी केलेल्या कौतुकाला महत्व देते. चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाला आलियाने एखाद्या पुरस्काराप्रमाणे मानायला हवे. परंतु, आलियाला चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा या शाहिदच्या मताशीदेखील आपण सहमत असल्याचे करिना म्हणाली. अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘उडता पंजाब’ चित्रपटात आलियाने एका बिहारी स्थलांतरित तरुणीची व्यक्तिरेखा साकारली आहे. उत्पन्नाच्या बाबतीत ‘उडता पंजाब’ या वर्षीच्या जबरदस्त सुरुवात करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

'उडता पंजाब'मध्ये आलिया भट
‘उडता पंजाब’मध्ये आलिया भट