करिना कपूर गरोदर असल्यापासून चित्रपट वर्तुळामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईच नुकतेच पार पडलेल्या ‘मामि फिल्म फेस्टिव्हल’मध्येही करिनाने हजेरी लावली होती. बॉलिवूडच्या ‘बेबो’ने नुकतीच ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. या चित्रपटाबद्दल ज्यावेळी करिनाला काही प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी तिने प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

‘मला चित्रपट फार आवडला. माझ्या मते चित्रपटातील सर्वच कलाकारांनी खुप छान काम केले आहे’, असे म्हणत ‘प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच आवडेल’ अशी आशा तिने व्यक्त केली. करिनाने या चित्रपटातील जवळपास सर्वच कलाकारांचे त्यांच्या नावानिशी कौतुक केले खरे. पण, यामध्ये तिने कुठेच पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या नावाचा उल्लेखही केला नाही. ‘करण जोहरच्या कारकिर्दीतील हा एक उत्तम चित्रपट आहे’, असे म्हणत करिनाने फवादच्या नावाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्षच केले. भारत-पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण पाहता भारतात सध्या पाकिस्तानी कालाकारांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळेच करिनाने फवादचा उल्लेख केला नसावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

पाकिस्तानी कालाकांना होणाऱ्या विरोधाविषयी ज्यावेळी करिनाला विचारण्यात आले त्यावेळी ती म्हणाली की, ‘मामि ही एक अशी जागा आहे जिथे चित्रपटाचा उत्सव अनुभवण्याची संधी मिळते. त्यामुळे इथे अशाच चित्रपटांविषयी बोलले जावे जे तुम्हाला आवडतात. मला नाही वाटत की वादग्रस्त विषयांवर या ठिकाणी चर्चा करणे योग्य ठरेल. इथे विविध कलाकार आणि त्यांच्या चित्रपटांविषयी चर्चा केली जाते. त्यामुळे मला नाही वाटत की, आपण ‘त्या’ विषयावर आता इथे बोलणे योग्य असेल’.

दरम्यान, बॉलिवूडमधील ही ‘टू बी मॉम’ तिच्या गरोदरपणातही फॅशन आणि चित्रपटविश्वापासून दूर गेलेली नाही. विविध कार्यक्रमांना आणि बी टाऊनमधील सेलिब्रिटी पार्टींमध्येही करिना हजेरी लावत आहे. नेहमीच वेगळ्या अंदाजात प्रसारमाध्यमांसमोर येणाऱ्या करिनावर अनेकदा चाहत्यांच्या नजरा खिळतात. सध्या करिना तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या निमित्तानेही चर्चेत आहे. पण अद्यापही या चित्रपटाच्या चित्रीकरणासंबंधीची अधिक माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.