कुटुंबात दोन बहिणी असल्या की, एकमेकांचे कपडे वापरणं ही गोष्ट सर्रास पाहायला मिळते. मुलांच्या बाबतीतही तसेच होते. पण हे झाले सर्वसामान्य भावा बहिणींचं. सेलिब्रिटी मात्र असे काही करत नसतील असे आपल्याला वाटत असते. पण याला अपवाद ठरलेत ते कपूर बहिणी. कितीही मोठ्या सेलिब्रिटी झाल्या तरी त्याही बहिणी पहिल्या आहेत. त्यामुळे एकमेकांचे कपडे वापरायला त्यांनाही काही वाटत नसेल.

त्याचे झाले असे की, करिश्मा कपूर सध्या सोशल मीडियावर फार सक्रिय असते. नुकताच तिने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोत करिश्माने रंगीब्रंगी स्कर्ट घातला होता. तसाच एक स्कर्ट करिनाने २०१३ मध्ये असाच स्कर्ट परिधान केला होता. आता २०१७ मध्ये करिश्मानेही तोच स्कर्ट पुन्हा एकदा घातला आहे. २०१३ मध्ये करिनाने या स्कर्टवर पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होता, एवीएटर गॉगल आणि स्लिंग बॅग यासारख्या स्टाइलिस्ट पेहरावात ती सैफ अली खानसोबत दिसली होती. तर करिश्माने काळ्या रंगाच्या टॉपवर हा स्कर्ट घातला होता. स्पेशल टच म्हणून या स्कर्टवर तिने गुलाबी रंगाचा स्कार्फ वापरला होता. यात या बहिणींचे प्रेम दिसते ही बाबही नाकारता येत नाही

kareena-kapoor

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून संदीप आणि करिश्मा यांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. घटस्फोटानंतर करिष्मा आणि संदीप ‘लिव्ह इन-रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचे देखील म्हटले जातेय. पण, अद्याप या दोघांनीही एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. मात्र रणधीर कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये संदीपचा ज्याप्रमाणे वावर होता त्यावरून तो कपूर कुटुंबाचा सदस्य बनला आहे असे दिसत होते. स्पॉटबॉय डॉट कॉम या संकेतस्थळाने सदर पार्टीतील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहता बहुधा कपूर कुटुंबाने करिष्मा आणि संदीपच्या नात्याला स्वीकारले असून संदीप त्यांच्या घरातील सदस्य बनवल्याचेही दिसत आहे.

करिष्माने गेल्या वर्षी दिल्ली स्थित व्यावसायिक संजय कपूर याच्याशी घटस्फोट घेतला होता. तब्बल १३ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना समायरा कपूर आणि किआन राज कपूर ही दोन मुले आहेत. संजयशी घटस्फोट घेतल्याच्या काही दिवसांनंतरच करिष्मा आणि संदीपच्या नात्याविषयी चर्चा होण्यास सुरुवात झाली.