करिष्माचे ‘रेडिओ जॉकी’ पर्व

बॉलीवूड अभिनेत्री करिष्मा कपूरचे आता ९२.७ बिग एफएम वाहिनीच्या माध्यमातून रेडिओ जॉकी म्हणून नवे

प्रतिनिधी , मुंबई | December 9, 2012 02:59 am

बॉलीवूड अभिनेत्री करिष्मा कपूरचे आता ९२.७ बिग एफएम वाहिनीच्या माध्यमातून रेडिओ जॉकी म्हणून नवे पर्व सुरू होणार आहे. चित्रपट आणि टीव्ही माध्यमात काम करून झाले आहे. आता मला नव्या माध्यमात काम करण्याची इच्छा होती आणि म्हणून रेडिओ माध्यमात काम करण्याचे ठरविले असून आवाजाच्या माध्यमातून आपल्याला चाहत्यांच्या संपर्कात राहायला मिळणार आहे, असे करिष्मा कपूरने सांगितले.
पेहराव कसा करावा, मनोरंजन उद्योगात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींनी केशरचना, त्वचा, व्यक्तिमत्व विकास या संबंधीचे बारकावे सूत्रसंचालक म्हणून काम करताना करिष्मा कपूर श्रोत्यांना सांगणार आहे.
९२. ७ बिग एफएमवरील ‘बिग मेमसाब’ या कार्यक्रमाद्वारे करिष्मा बॉलीवूडमधील आपले वैयक्तिक अनुभव, वेगवेगळे ‘फॅशन ट्रेण्ड्स’ याविषयी श्रोत्यांना माहिती देणार आहे. हा कार्यक्रम याच महिन्यात सुरू केला जाणार आहे.
अलीकडेच थरारपटाद्वारे करिष्मा कपूरने मोठय़ा पडद्यावर पुनरागमन केले होते.  मात्र अचानक तिने दुसऱ्याच माध्यमाकडे झेप घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े    

First Published on December 9, 2012 2:59 am

Web Title: karisma kapoor turns radio jockey