करिश्मा कपूर आणि तिचा प्रियकर संदीप तोशनिवाल यांचे प्रेमसंबंध हे आता उघड सत्य झालं आहे. हे दोघंही एकमेकांसोबत अनेक सार्वजनिक ठिकाणी आत्मविश्वासाने फिरताना दिसतात. सध्या संदीप हा कपूर कुटुंबियांमध्ये आवडती व्यक्ती झाला आहे. कपूर कुटुंबियांच्या अनेक सोहळ्यांमध्ये तो आवर्जून उपस्थित असतो. आता असे म्हटले जाते की, संदिप लवकरच करिश्माला लग्नासाठी अधिकृत मागणी घालणार आहे.

प्रशांत दामलेंच्या गोंडस नातीचे फोटो

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

karisma-kapoor-and-sandeep-toshniwal-with-mother-babita-at-randhir-kapoors-70th-birthday-bash-3

सध्या संदीप त्याची पहिली पत्नी अशरितासोबत घटस्फोटाच्या प्रक्रियेत होता. पण आता या घटस्फोटाची प्रक्रिया १९ जुलैपर्यंत पूर्ण होणार असे म्हटले जाते. त्यामुळे सध्या संदीप करिश्माला लग्नाची मागणी नेमकी कशी घालता येईल याचा विचार करत आहे. संदीप लवकरच करिश्माला अधिकृत लग्नाची मागणी घालून जुहू येथे ३ बेडरूमचा फ्लॅट घेणार आहे. काही महिन्यांपूर्वी अशीच एक बातमी प्रसिद्ध झाली होती. ज्यात करिश्मा आणि संदीप जुहू येथे नवीन घराच्या शोधात असल्याचं म्हटलं होतं. जर या घटनेचा संदर्भ आता जोडला गेला तर सगळ्या गोष्टी जुळून येताना दिसतात.

karisma-kapoor-and-sandeep-toshniwal-with-babita-mingling-around-at-randhir-kapoors-70th-birthday-bash-2

‘काही वर्षांपूर्वी संदीप आणि करिश्माची ओळख पार्टीत एका मित्राच्या मध्यस्थीने झालेली. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये ते भेटत राहिले आणि त्यांच्यातल प्रेम अधिक बहरत गेलं. संदीप हा एका औषध उत्पादक कंपनीचा सीईओ आहे. त्यामुळे आता संदीप आणि करिश्मा यांचं आयुष्य भविष्यात कोणतं नवीन वळण घेतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. करिश्माचे चाहत्यांच तिच्याकडून आनंदाची बातमी कधी मिळतेय याकडेच लक्ष लागून राहिलं आहे.

‘कोणत्याही मुलीला किस केल्यास मी तुझे ओठ चिरेन’

दरम्यान, करिश्माचा पहिला पती संजय कपूर यानेदेखील नुकताच नव्याने संसार थाटला. त्याने अभिनेत्री, मॉडेल प्रिया सचदेव हिच्याशी खासगी सोहळ्यात लग्न केले.