‘फितुर’ या चित्रपटानंतर कतरिना कैफ कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. या काही महिन्यांच्या कालावधीत तिने स्वत:चा मेकओव्हर केला. ‘बार बार देखो’ या चित्रपटातील तिचा हा मेकओव्हर प्रेक्षकांना नक्कीच भुरळ पाडेल यात काही शंका नाही.  ‘फितुर’ या चित्रपटात अभिनेता अदित्य रॉय कपूरसोबत कतरिना महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. पण, हा चित्रपट तिकीट खिडक्यांवर आणि रसिकांवर फारशी जादू करु शकला नाही. तरीही या चित्रपटातील कतरिना आणि आदित्यची केमिस्ट्री सिनेवर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती.
अनेकांचे असे मत आहे की, सध्या कतरिना तरूण कलाकारांसोबत अगदी सहजतेने ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘बार बार देखो’ची सध्या चित्रपट वर्तुळात चर्चा आहे. या दोघांमध्यल्या केमिस्ट्रीलाही रसिकांची पसंती मिळत असून कतरिना आणि सिद्धार्थचे फोटो सुद्धा सोशल मीडिया गाजवत आहे. ‘बार बार देखो’ या चित्रपटातील कतरिना कैफचा ‘बोल्ड’ अवतार पाहता या लूकसाठी तिने फार मेहनत घेतल्याचे दिसत आहे.
नव्या जोमाच्या, तरुण कलाकारांसोबत काम करण्याच्या बाबतीतही कतरिना बरीच सजग असते. त्यामुळे फक्त आणि फक्त प्रसिद्ध कलाकारांसोबतच काम करण्याला कतरिना प्राधान्य देते ही बाब आता नाकारावी लागेल. ‘फितुर’आणि ‘बार बार देखो’ही यापैकीच काही उदाहरणे आहेत. कतरिनाचा बहुचर्चित ‘बार बार देखो’ हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून यानंतर कोणत्या नवख्या कलाकारासोबत ‘कमली’ कतरिना स्क्रिन शेअर करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहीले आहे.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत
vasai liquor party on boat marathi news, roro boat liquor party marathi news
वसई-भाईंदर रोरो सेवेच्या बोटीत मद्य पार्टी, समाजमाध्यमांवर चित्रफित प्रसारित