बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. सध्या सोशल मीडियावर फार सक्रिय असणाऱ्या कतरिनाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती पुश- अप्स मारताना दिसते. कतरिना इतक्या सफाईने पुश- अप्स मारतेय की तिच्या एवढं चांगले पुश- अप्स कोणी मारुच शकत नाही असं या व्हिडिओकडे पाहून लक्षात येतंय. या व्हिडिओमध्ये ती सुरुवातीला ती दोन्ही हातांवर पुश- अप्स मारताना दिसते तर, थोड्यावेळाने ती एक हात पाठीमागे घेऊन फक्त एका हातावरच पुश- अप्स मारते. व्हिडिओच्या शेवटी तर ती दोन्ही हात पाठीमागे घेऊन पुश अप्स मारताना दिसते. पण ती हे कसं करते हीच खरी मजा व्हिडिओच्या शेवटी आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही तुमचं हसू रोखू शकणार नाही.

माझी नसबंदी निसर्गही करु शकत नाही- धर्मेंद्र

कतरिना सध्या मोरक्कोमध्ये ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाचे चित्रीकरण करतेय. सोमवारी रात्री कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केलाय. सलमान आणि कतरिनाच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमाकडे आता अनेकांचे लक्ष आहे. कारण या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांनाही या जोडीची केमिस्ट्री पाहण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान, आयफा अवॉर्ड २०१७ मध्येही अनेकांच्या नजरा या कतरिना आणि सलमानवरच होत्या. एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलत असताना अचानक सलमानला कतरिना दिसली आणि तो तिची चौकशी करायला पत्रकार परिषद सोडून तिच्याकडे गेला. त्याच्या या कृतीमुळे हे दोघं पुन्हा एकदा नात्यात अडकणार का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांना पडलाय.