‘मोहब्बते’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सुंदर अभिनेत्री किम शर्मा तुम्हाला माहितीच असेल. मागील काही दिवसांपासून किम शर्मा आपल्या वैवाहिक जीवनावरून अनेकदा चर्चेत राहिली आहे. किम आता पती अली पुंजानीला सोडून मुंबईला परतली आहे. पतीशी विभक्त झाल्यानंतर किम आता कामाच्या शोधात आहे. मात्र सर्वांत आश्चर्यकारक बातमी अशी आहे की किम आता एका कंपनीसाठी फुकटात काम करत आहे.

काही दिवसांपासून किमने जावेद जाफरीच्या इंडियन डॉक्युमेंट्री फाऊंडेशनच्या ‘गुड पिच इंडिया’ या कार्यक्रमासाठी काम करण्यास सुरूवात केली आहे. फेब्रुवारीपासूनच किम या कार्यक्रमासाठी काम करते आहे. अभिनय क्षेत्रात फारशी प्रगती न मिळाल्यानंतर किमने बिझनेसमन पुंजानीसोबत लग्न करून केनियात स्थित झाली होती. मात्र वैवाहिक जीवनही ठिक न चालल्याने किम पुन्हा मुंबईला परतली आहे.

वाचा : आई तसा लेक!

क्रिकेटर युवराज सिंगपासून ते अनेक मोठ्या व्यक्तींसोबत किमचे नाव अनेकदा जोडले गेले आणि आतासुद्धा फॅशन डिझायनर अर्जुन खन्नासाठी किमने नवऱ्याला सोडल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका शो दरम्यान या दोघांना एकत्र पाहिले गेले होते.