या वर्षी इंडियन नॅशनल थिएटर अर्थात आयएनटी या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत कीर्ती महाविद्यालयाने सादर केलेली ‘एव्होलुशन एक्वेशन मार्क’ ही एकांकिका ‘प्रथम’ क्रमांक मिळवून विजयी झाली आहे. कीर्ती महाविद्यालयाला सुमारे ३५ वर्षांनंतर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

या युवा टीमने मिळवलेल्या यशा निमित्त कीर्ती नाट्यपरिवारातील सर्व आजी-माजी कलाकारांनी एकत्र येऊन २२ ऑक्टोबर २०१७ ,रविवारी संध्याकाळी ४.०० वाजता कीर्ती महाविद्यालयात “कौतुक सोहोळयाचं आयोजन केलेे आहे. कीर्ती महाविद्यालयातील सर्व आजी-माजी नाट्य मंडळी या निमित्ताने पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. गतस्मृतीना उजाळा देत आपले अनुभव नव्या टीम सोबत शेअर करता करता या नव्या नाट्य मंडळींना ‘कीर्ती नाट्य परिवाराची’ ओळख करून देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या ‘रियुनियन’ कार्यक्रमाला सर्व आजी-माजी नाट्यमंडळींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.