सलमान उपस्थित असलेल्या पत्रकार परिषदेत त्याला पूर्वाश्रमीच्या प्रेयसींबद्दल विचारले जाणे हे काही नवीन नाही. बॉलीवूडमधील मोस्ट एलिजीबल बॅचलर असलेल्या सलमानची प्रेमप्रकरण बरीच गाजलेली आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्याचे ऐश्वर्यासोबत पूर्वी असलेले प्रेमसंबंध.
बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या सेटवर आगामी चित्रपटांचे प्रमोशन केले जाते. त्यात आता ऐश्वर्याचा जजबा हा चित्रपटदेखील प्रदर्शित होत आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी सलमानला प्रश्न विचारला की, ऐश्वर्या तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बॉसमध्ये येणार का? सलमानने या प्रश्नाकडे आधी दुर्लक्ष केले. पण, अनेकांकडून तोच प्रश्न विचारला गेल्यानंतर शेवटी तो म्हणाला की, “क्या जजबाती सवाल पूछा है?” त्याने हे उत्तर मस्करीत दिले की त्याला खरचं अजूनही ऐश्वर्याबद्दलच्या प्रश्नांनी फरक पडतो हे त्याचे त्यालाचं माहित, असो. अखेर पत्रकार परिषदेच्या शेवटी ‘आते जाते जो मिलता है तुमसा लगता है’, हे गाणे गाऊन त्याने आपल्या भावना व्यक्त केल्याचं.