नाशिकचा चेतन वडनेरे ‘लेक माझी लाडकी’ मालिकेत

महाविद्यालयीन तरुणांच्या नाटय़वेडाला एक मंच देणे एवढय़ाच मर्यादित भूमिके त न राहता त्यांना त्यात कारकीर्द घडविण्याची संधी देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही पहिली अशी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासूनच राज्यभरातील मुला-मुलींनी मालिका-चित्रपटांपर्यंतचा प्रवास केला आहे. नाशिकचा चेतन वडनेरे हा तरुणही याच ‘लोकांकिका’च्या मंचावरून छोटय़ा पडद्यावर झळकला आहे.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Nashik, Foreign state Businessman, Mobile parts, Shut Shops, Second Day, Dispute, Local Marathi Businessmen,
नाशिकमध्ये अमराठी व्यावसायिकांकडून मराठी युवकांची कोंडी, दुकाने बंद राहिल्याने भ्रमणध्वनी दुरुस्तीचे काम ठप्प

‘लोकसत्ता लोकांकिका’ पहिली घंटा!

चेतनप्रमाणेच राज्यभरातील तरुणांना थेट रंगमंचावरून मालिका-चित्रपटापर्यंत पोहोचण्याची संधी ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत, ‘केसरी’ आणि ‘झी युवा’ सहप्रायोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ महोत्सवाचे प्रवेश अर्जही आता  उपलब्ध झाले आहेत.  हे प्रवेश अर्ज indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika2016 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. लवकरात लवकर प्रवेशिका भरून ‘लोकांकिका’च्या माध्यमातून कलाकार म्हणून तुमच्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची ही सुवर्णसंधी आहे.

रंगभूमीवर नवे काही सांगू पाहणाऱ्या राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’ने या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन सुरू केले. आता या स्पर्धेचे तिसरे पर्व ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. याही वर्षी ‘लोकांकिका’मधून चमकणाऱ्या स्पर्धकांना मालिका-चित्रपटातून संधी देण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर म्हणून काम पाहणार आहे, तर ‘झी युवा’ हे नाव नव्याने यात जोडले गेले असून ‘लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीचे प्रसारण या नव्या तरुणांसाठीच्या वाहिनीवरून करण्यात येणार आहे. राज्यातील आठ केंद्रांवर प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरी पार पडल्यानंतर या स्पध्रेची महाअंतिम फेरी यंदा १७ डिसेंबर रोजी पार पडेल.

‘लोकांकिका’ची प्राथमिक फेरी मुंबई, पुणे, ठाणे यांच्यासह रत्नागिरी, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर अशा आठ केंद्रांवर रंगणार आहे. या केंद्रांवरच्या प्राथमिक फेरीतून उत्तम एकांकिका त्या विभागांमधील अंतिम फेरीसाठी निवडल्या जातील त्यानंतर विभागीय अंतिम फेरीत पहिली आलेली एकांकिका त्या विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाअंतिम फेरीत दाखल होईल. स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

  • प्राथमिक फेरी : २६ नोव्हेंबरपासून
  • केंद्र : मुंबई, पुणे, ठाणे यांच्यासह रत्नागिरी, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर

दोन वर्षांपूर्वी ‘लोकांकिका’मध्ये आम्ही ‘के. के. वाघ’ महाविद्यालयाकडून ‘हे राम’ ही एकांकिका सादर केली होती. या स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर असणाऱ्या ‘आयरिस प्रॉडक्शन’ने माझे नाव, संपर्काचा तपशील लिहून घेतला होता. तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात होतो. ‘लोकांकिका’मुळे अभिनयाच्या छंदाला व्यावसायिक मूल्य जोडण्याचे स्वप्न पूर्ण झाले.  – चेतन वडनेरे, अभिनेता