पाच नाही सहा अनोळखी व्यक्ती, त्यांचे एकाच क्रूझवर एकत्र येणे आणि तीन देशांमधली भ्रमंती असं सगळं भव्यदिव्य समोर घेऊन आलेला वन वे तिकीट चित्रपट हा चकवा आहे. आपण एकाच जागेवर बसून दोन तास पडद्यावरच्या कलाकारांबरोबर किती गोल गोल फिरतो. पण त्यानंतरही आपण बसल्या जागीच असतो. पाँड्सचे ड्रीमफ्लॉवर जेवढी ताजगी देते तेवढीही ताजगी हा चित्रपट देत नाही.

रहस्यमय कथेतलं रहस्य एक तर प्रेक्षकांना कळू नये किंवा कळत असलं तरी त्या रहस्याने शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवावं असा काहीसा मापदंड असतो असं म्हणतात. पण चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला सहाव्या माणसाचं रहस्य कळलेलं असतं जरी ते प्रोमोपासून लपवून ठेवलेलं असलं तरी.. तर परदेशात नोकरीच्या आमिषाने येऊन पोहोचलेला अनिकेत (शशांक केतकर). गावची जमीन आणि आईचे दागिने विकून तिथवर पोहोचलेल्या अनिकेतला त्या नावाची कुठलीच कंपनी नसते हे कळतं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. परदेशात फसलेल्या अनिकेतला त्याच रात्री एका गोळीबाराच्या घटनेत कोणा एका आदित्य राणेचा (गश्मीर महाजनी) पासपोर्ट, त्याचे पसे आणि क्रूझचं तिकीट सापडतं. मायदेशात परतण्यासाठी हा एकमेव धोकादायक पर्याय स्वीकारून अनिकेत क्रूझवर पोहोचतो. तिथे त्याची ओळख परदेशात क्रूझवर येतानाही पर्समध्ये आठवणीने पाँड्स ड्रीमफ्लॉवर टाल्कम पावडरचा छोटा डबा ठेवून वावरणारी आदित्यची प्रेयसी अमृता खानविलकर भेटते. तिथे समर राज नावाचा ब्लॉगर (सचित पाटील) आणि त्याची साहाय्यक (नेहा महाजन) असे सगळे एकत्र एकमेकांना भेटतात. त्यातून पुढचा रहस्यमय प्रवास घडतो. समर राज आणि त्याची साहाय्यक रेसमधील अनिल कपूर आणि समीरा रेड्डी जोडीची आठवण करून देतात. मात्र समरच्या तोंडी पदोपदी येणाऱ्या शायरीने लोकांची मने रिझवण्याऐवजी उचकवण्याचा प्रयत्न जास्त केला आहे.

chamkila-movie-release-date
ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार इम्तियाज अलीचा बहुचर्चित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’; वाचा कुठे पाहायला मिळणार?
Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
Gautami Patil First Time Revels Real Name Chatting With Fan Gautami Patil Lavani Video To Surname and Leaked Video Controversy
गौतमी पाटीलचं खरं नाव माहितेय का? चाहतीशी गप्पा मारताना स्वतःचं केला खुलासा.. आडनावावरूनही झाला होता वाद!
geethanjali-malli-vanchidi
चक्क स्मशानभूमीत प्रदर्शित होणार चित्रपटाचा टीझर; चित्रपटसृष्टीतील पहिल्या सर्वात धाडसी इव्हेंटबद्दल जाणून घ्या

चित्रपटाच्या कथेतच इतक्या चुका आहेत की पहिल्या फ्रेमपासूनच आपण शंकाग्रस्त होतो, विशेषत: अनिकेतचे आदित्यच्या पासपोर्टवर क्रूझवर सहजी शिरणे पटत नाही. आदित्य हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे, याच्या बातम्या मोठमोठय़ाने क्रूझवर सुरू असतात. मात्र क्रूझवर या नावाचा प्रवासी आहे याची साधी दखलही क्रूझ व्यवस्थापन घेत नाही. रहस्यमय कथेला आदित्यच्या रूपाने देहविक्री रॅकेटची समस्याही ठिगळासारखी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. गाणी तर इतक्या वेगाने येऊन आदळतात.. शशांक केतकर आणि अमृतावर चित्रित झालेले रेशमी रेशमी हे गाणे श्रवणीय झाले आहे. अनिकेतची भूमिका शशांकसाठी चपखल असल्याने त्याने अगदी प्रामाणिकपणे आणि अचूकपणे ती साकारली आहे. गश्मीरने धोका पत्करून ही वेगळी व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याच्या विक्षिप्त वागण्यामागचे कारणच कथेत नसल्याने त्याचा परिणामही कमी होतो. अमृता, नेहा आणि सचितच्या भूमिकेलाही खूप मर्यादा आहेत. रहस्यपटापेक्षाही पाँड्सची जाहिरात ही या चित्रपटाचे एक वैशिष्टय़ ठरू शकते. खूप अपेक्षा असलेला हा चित्रपट घोर निराशा करतो.

वन वे तिकीट

दिग्दर्शक अमोल शेटगे

कलाकार शशांक केतकर, गश्मीर महाजनी, सचित पाटील, अमृता खानविलकर, नेहा महाजन