नेहमीच जगणं अनेकांनाच कंटाळवाणं वाटतं. रोज काय तेच ते करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. पण याला अपवाद ठरलाय तो जॉली एलएलबी २ स्टार अक्षय कुमार. एकीकडे त्याने आयुर्वेदाचे महत्त्व सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला, तर दुसरीकडे आज महाशिवरात्रीच्या दिवशी त्याने त्याच्या चाहत्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. आज अनेक कलाकार मंडळी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत आहेत. पण अक्षयने मात्र या शुभेच्छांना आपला टच दिला असेच म्हणावे लागेल.

त्याने सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो ट्विटरवर शेअर केला. या फोटोला त्याने छानसा मेसेजही लिहिला आहे. अक्षयने लिहिले की, ‘सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. शिवजी तुम्हा सर्वांच्या सगळ्या समस्या ४जी प्रमाणेच जलद दूर करो. हर हर महादेव. सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.’

शंकराने पार्वतीशी याच दिवशी लग्न केले होते म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी हजारो शिवभक्त शंकराच्या मंदिरात दर्शनाला जातात. दरम्यान, बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देताना लिहिले की, सगळीकडे शांतता येवो अशी मी प्रार्थना करतो.

 

सर्वजण आज शंकराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर दुसरीकडे अभिनेत्री सोनम कपूरने मात्र तिने शंकरासह पार्वतीचाही फोटो शेअर करुन या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिलेय की, भगवान शीव पृथ्वीतलावरील सर्व जीवांचे रक्षणकर्ता आहेत. शंकर देवाची अर्धांगिनी आणि त्यांचे शक्तीस्थान असलेल्या पार्वती देवी यांच्यासाठीदेखील मी आजचा दिवस साजरा करू इच्छिते. तसेच हेमा मालिनी यांनीही महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असा संदेश दिला आहे.

https://www.instagram.com/p/BQ4dOM3lvVE/