मलायका अरोराला चर्चेत कसं राहायचं हे चांगलंच माहितीये. मंगळवारी ती मुंबई विमानतळावर एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत होती. तिचा तो लूक पाहून विमानतळावर उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

नेहमीचा तोच तोचपणा अनेकदा कंटाळा देतो. त्यामुळे प्रत्येकजण दिनक्रमात थोडा बदल करुन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. यात आपले कलाकार तरी कसे मागे राहतील. मलायकाचे हे फोटो तिच्या चाहत्यांसाठी सुखद धक्काच असतील यात काही शंका नाही.

malaikachoththreew-1

 

malaikachoththreew-2

malaikachoththreew-3

malaikachoththreew-4

आहे ना ही हटके हेअरस्टाईल? गेल्यावर्षी पती अरबाज खानशी घटस्फोटाच्या घटनेनंतर मलायका अधिक चर्चेत राहायला लागली आहे. पार्टी, मित्र- मैत्रीणींसोबत वेळ घालवणं या सगळ्याचे अपडेट ती तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन सतत देत असते. फ्लोरल ड्रेस, ब्ल्यू जीन्स आणि मोठा चश्मा घातलेली मलायका वेगळीच दिसत होती. बॉलिवूडच्या या मायानगरीत स्वतःला टिकवून ठेवायचे असेल तर फिटनेसला पर्याय नाही हे ती चांगलीच ओळखून आहे. त्यामुळे स्वतःला फिट ठेवण्याला ती नेहमीच प्राधान्य देते.