मल्याळम चित्रपटांतील अभिनेत्री भावना हिचे गेल्या शुक्रवारी कोची येथे अपहरण करण्यात आले होते. यासंदर्भात सिनेसृष्टीमध्ये महिलेंवर होणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली होती. पण मल्याळम दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी या घटनेबाबत एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री भावना हिच्यावर गाडीत बलात्कार करण्यात आला होता अशा बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध होत होत्या. यावर आता त्यांनी खुलासा केला आहे. मल्याळम अभिनेत्रीवर गाडीत बलात्कार झालेला नाही. प्रियदर्शन हे भावनाशी बोलले तेव्हा तिने हे स्पष्ट केले की, तिच्यावर बलात्कार झाला नसून तिचा लैंगिक छळ करण्यात आला होता. यात अज्ञात व्यक्तिंमध्ये तिचा ड्रायव्हरही सामिल होता. तिच्यावर बलात्कार झालेला नाही. कोणी अशा पद्धतीची बातमी कशी काय देऊ शकतं? या सर्व प्रकरणानंतर माझे तिच्याशी बोलणे झाले, तेव्हा तिने मला अगदी स्पष्टपणे सांगितले की तिच्यावर बलात्कार झालेला नाही.

तिचा आधीचा ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांनी मिळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे ते गुन्हेगार आता तुरुंगात आहेत. त्यांनी जबरदस्तीने भावनाच्या गाडीत शिरकाव करुन तिचे कपडे फाडले. नंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ काढून तिला अर्ध्या रस्त्यावर सोडून दिले. तिला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने त्यांनी हे सर्व केले होते, असे बॉलिवूड हंगामा या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन यांनी स्पष्ट केले.

Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
two groups of bjp leaders clash during meeting
मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला
woman
समुपदेशन : आईपणाचा परिघ

अशा प्रकारची घटना कोचीमध्ये घडणे हे फार धक्कादायक आहे. कोचीमध्ये सगळेच एकजूट समुदायाने राहतात. इथे प्रत्येकजण एकमेकांना ओळखत असतो. त्यामुळे कोणीही असे काही काम करत नाही, ज्याने त्या व्यक्तीला आणि पर्यायाने समाजाला नावं ठेवली जातील. मी भावनाला फार आधीपासून ओळखतो. ती खूपच मनमिळाऊ, हसमुख अशी व्यक्ती आहे. मल्याळम सिनेसृष्टीतील भावना हे एक नावाजलेले नाव आहे.

भावना शुक्रवारी रात्री तिच्या गाडीतून कोचीहून थ्रिसर येथे जात असताना टेम्पोमध्ये बसलेल्या काही व्यक्तिंनी तिचा पाठलाग केला होता. अथनी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सदर टेम्पोने भावनाच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर भांडणाच्या निमित्ताने या टोळीने गाडीचा ड्रायव्हर मार्टिन याला आत ढकलले. मिळालेल्या माहितीनुसार, सदर अज्ञात व्यक्तिंनी भावनाचे अपहरण करून जवळपास दीड तास तिला गाडीत डांबून ठेवलं होतं. यावेळी त्यांनी तिचे काही फोटो आणि व्हिडिओदेखील काढले होते. भावनाने आतापर्यंत मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलगु या भाषांमध्ये काम केले आहे.