सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या बर्थडे पार्टीमध्ये रविवारी फॅशन जगतातील दिग्गजांनी वर्णी लावली होती. रात्री उशीरा झालेल्या बर्थडे पार्टीचे फोटो मनिषने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. बॉलिवूडमधील कलाकारांच्या अभिनय अधिक खुलविण्यासाठी सर्रास कलाकार मनीष मल्होत्रा यांनी डिझायन केलेले ड्रेसेस वापरतात. बॉलिवूड तारकांना सजविणारा हा डिझायनर आपल्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये काळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा चुडीदार परिधान करुन पार्टीमध्ये पाहुण्याच्यात आनंदाने पार्टी एन्जॉय करताना दिसला. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध डिझायनरच्या पार्टीतील प्रमुख आकर्षण त्याचे कपडे नाही तर केक होता. ५० व्या वाढदिवासा दिवशी मनिषने ५० किलोचा चॉकलेट केक कापून पार्टी सिलेब्रेशन केले. या सिलेब्रेशनला बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील उपस्थित होती.

शरिरयष्टीने सडपातळ असणाऱा मनीष हा अस्सल खव्वय्या आहे. त्यामुळेच आपल्या पार्टीमध्ये ड्रेसवरील डिझायनिंगने लोकांना आकर्षित करण्यापेक्षा त्याने केकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  आपल्या पार्टीतील आकर्षणचा केंद्र बिंदू ठरलेला केक प्रसारमाध्यमांना देखील दिला. काही दिवसांपूर्वी मनिष मल्होत्राने कतरिना कैफसोबत मालदिवमधील फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले होते. कतरिना कैफ एका मासिकाच्या फोटोशूटसाठी मालदिवला गेली होती. यावेळी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा तिच्या सोबत होता. मनिषने कतरिनासोबतचे काही फोटो इन्स्ट्रामवरुन शेअर केले होते.
वाढदिवसाची पार्टी साजरी करणाऱ्या मनिष मल्होत्राच्या घरी अनेकदा पार्टीसाठी बॉलिवूड तारकांची मांदियाळी यापूर्वी देखील दिसली आहे, अभिनेत्री प्रिती झिंटा, मलायका अरोरा खान, करिष्मा कपूर, नेहा धुपिया, अमृता अरोरा यांच्यासह इतर अनेक बॉलिवूडमधील कलाकारांसोबतचे अनेक क्षण मनिषने यापूर्वी देखील इन्स्ट्राग्रामवरुन शेअर केले आहेत. मात्र सध्या पार्टीमध्ये कोण आले यापेक्षा भल्या मोठ्या चॉकलेट केकची चांगलीच चर्चा रंगली आहे.