गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार सिनेमा म्हणून मराठी सिनेमाचे नाव आवर्जुन घेतले जाते. आपणही मराठी आहोत याचा गर्व या सिनेमांच्या मानांकनातून प्रकर्षाने जाणवायला लागला. पण मराठी सिनेमा पाहायची उत्सुकता मात्र होती तिथेच राहिली.

‘श्वास’, ‘देऊळ’, ‘कोर्ट’, ‘कासव’ आणि यावर्षी प्रदर्शित होणारा ‘रिंगण’ हे त्यातलेच काही सिनेमे. यातल्या काही सिनेमांनी तर ऑस्करवारीही केली. पण जरी या सिनेमे जरी ग्रेट असले तरी त्यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन मात्र फारसे चांगले नव्हते. काही हिंदी टुकार सिनेमांपेक्षाही या सिनेमांचे कलेक्शन कमी झाले. पण यावर्षी असं होऊ नये म्हणून मराठी सिनेमाचा एक नवीन चेहरा असलेल्या प्रथमेश परबने एक पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. या वर्षी प्रदर्शित होत असलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘रिंगण’ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावा म्हणून प्रथमेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले आहे. हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन अधिक लोकांपर्यंत पोहोचवा असे तो या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.

https://www.instagram.com/p/BVtcaLdFHyl/

जेव्हा एखादा अभिनेता त्याचा सिनेमा नसतानाही केवळ मराठी सिनेमा पुढे यावा यासाठी लोकांना आवाहन करतो तेव्हा आपण हे नक्कीच मानू शकतो की मराठी सिनेमा मोठा होत चालला आहे. काही दिवसांपूर्वी प्रथमेश प्रेम हे या मालिकेत दिसला होता. प्रथमेश परब आणि कृतिका देव यांची काळजाला हात घालणारी अप्रतिम प्रेमकथा झी युवावर दाखवण्यात आली होती.