21 October 2017

News Flash

‘नच बलिये’साठी सिद्धार्थ जाधव करतोय ‘हानिकारक रिहर्सल’

...डिसिप्लिन इतना खूदकुशी के लायक है

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 20, 2017 4:37 PM

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मराठी कलाविश्वामध्ये सिद्धार्थ जाधवने स्वत:चा वेगळा असा चाहतावर्ग निर्माण करण्यात यश मिळवले आहे. मराठी रंगभूमीपासून ते अगदी चित्रपट आणि विनोदी कार्यक्रमांपर्यंत सिद्धार्थने त्याच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे. आपल्या अनोख्या अभिनय शैलीने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा अभिनेता लवकरच ‘नच बलिये’ या डान्स रिअॅलिटी शोद्वारे त्याच्या बलियेसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती नच बलियेच्या आठव्या पर्वासाठी फार मेहनत घेत असून नृत्याच्या सरावासाठी वेळ देत आहेत. याच सरावाचा एक व्हिडिओ सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. ज्यामध्ये नृत्याचा सराव करुन थकलेला सिद्धार्थ सर्वांना पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ जाधव ‘दंगल’ चित्रपटातील ‘हानिकारक बापू’ या गाण्याद्वारे त्याची व्यथा अगदी विनोदी पद्धतीने मांडताना दिसतोय. सिद्धार्थच्या चेहऱ्यावरील भाव या व्हिडिओला आणखीनच विनोदी बनवत आहेत. दरम्यान, मराठीतील हा सुपरस्टार त्याच्या पत्नीसोबत नच बलियेसाठी खूप सारी मेहनत घेत असून सोशल मीडियाद्वारे विविध पोस्ट करत तो चाहत्यांपर्यंत ही सारी धमाल पोहोचवत आहे. टेलिव्हिजन विश्वात ‘नच बलिये’ या कार्यक्रमाला असणारी लोकप्रियता पाहता या कार्यक्रमातील सिद्धार्थच्या परफॉर्मन्सकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tu mera dil …tu meri jaan…, @nachbaliye8.official #truptiakkalwar #siddhumoments

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

Comedy and dance both are very complicated, isn’t it @AkkalwarTrupti? #NachBaliy8 @StarPlus #super #excited #siddhumoments

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

‘नच बलिये’ या कार्यक्रमाचे हे आठवे पर्व असून सचिन पिळगावकर, अमृता खानविलकर यांच्यामगोमाग आता सिद्धार्थच्याही नावाचा समावेश झाला आहे. त्यामुळे विनोदाच्या मैदानात फटकेबाजी करणारा सिद्धार्थ नृत्याचे आव्हान पेलू शकणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या या कार्यक्रमासाठी बऱ्याच सेलिब्रिटी नावांची चर्चा असून त्यातील काही जोड्यांनी कार्यक्रमासाठीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी-विवेक डाहीया, सनाया इरान-मोहित सेहगल अशा सेलिब्रिटी जोडप्यांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे यंदाच्या ‘नच..’च्या पर्वातही प्रेक्षकांचे मनोरंजन होणार यात शंकाच नाही.

First Published on March 20, 2017 4:37 pm

Web Title: marathi actor siddharth jadhav posts his rehersal video during nach baliye season 8