मराठी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मनोरंजन जगतात आणखी एक नवीन चॅनेल सुरु होणार आहे. ‘व्हायरस मराठी’ नावाने सुरु होत असलेल्या युट्युब चॅनलद्वारे ‘ऑसम टूसम’ या मराठी वेब सीरिजचा शुभारंभ होणार आहे. या वेब सीरिजचा पहिला एपिसोड २८ मार्चला दुपारी ४ वाजता चॅनेलवर अपलोड करण्यात येईल. सोशल मीडियाच्या लोकप्रियतेमुळे नव्या रुपात प्रेक्षकांची मनं जिंकण्यात मराठी वेब सीरिज कितपत यशस्वी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

या नव्या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री गौरी नलावडे आणि नृत्यांगना रिचा अग्निहोत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या वेब सीरिजच्या माध्यमातून या दोघी महाराष्ट्रातील गूढ, अगम्य जागा प्रेक्षकांना दाखवून देताना दिसतील. या शोची संकल्पना आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील तरुणाईला एका अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र दर्शन घडविण्यासाठी या दोघी आडवाटेला गवसणी घालून कानाकोपऱ्यात भटकंती करताना दिसतील. वेब सीरिजबद्दल बोलताना संतोष कोल्हे म्हणाले की, गूढ आणि नैसर्गिक आश्चर्याने नटलेला महाराष्ट्र फिरायचा अशी कल्पना होती, या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी टीमने खूपच मेहनत घेतली आहे. ‘द फिल्म क्लिक’ आणि ‘कनेक्ट फिल्म्स’ या संस्थांनी या वेब चॅनलची निर्मिती केली आहे.

Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
ED Sheeran
हॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला लागले महाराष्ट्राच्या मिसळ पावचं वेड! ED Sheeranने स्वत: बनवली झणझणीत मिसळ, Video एकदा बघाच
22 stripes tigers spotted found in radhanagari wildlife
सिंधुदुर्ग-कोल्हापूर डोंगररांगांत २२ पट्टेरी वाघ!

unnamed

मराठी मनोरंजन क्षेत्रात व्हलगर, बोल्ड किंवा शिवीगाळ अशा आशयाचा कंटेन्ट न देता, सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यातील घडामोडींवर बेतलेल्या मालिका या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मराठी प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती देण्यासाठी संतोष कोल्हेसोबतच श्रीधर चिटणीस हे देखील काम करताना दिसतील.