अभिनयला चिकन फार आवडतं तर मला आणि स्वानंदीला मासे प्रचंड आवडतात. काही ठराविक वार आणि प्रसंग सोडले तर आमच्या घरी चिकन, मासे नेहमीच होतात. पूर्वी घरी तांबडा-पांढरा रस्सा, झणझणीत चिकन केलं जायचं. पण, आता अभिनयचं वर्कआऊट आणि फिटनेसकडे जास्त लक्ष असल्यामुळे गेल्या दोन- तीन वर्षांपासून आम्ही ‘ग्रील्ड चिकन’ आणि त्याच पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ खाण्यावर भर देत आहोत. अभिनयचा वर्कआऊटचा ‘चिट डे’ असतो तेव्हा आम्ही तांबडा- पांढरा रस्सा किंवा ‘सुकट’ (सुके मासे) यावर न चुकता ताव मारतो.
आम्ही मासे तळून खात नाही. पापलेट, बोंबील, मांदेली, कोळंबी कोणतेही मासे आम्ही बेक करुन खातो. आवडीचा कोणताही मासा घेऊन त्याला हळद, तिखट, मीठ लावायचे. त्यानंतर आलं-लसूण- कोथिंबीरची पेस्ट आवडत असल्यास ती लावावी आणि लिंबू किंवा कोकमाचा रस (आगळ) लावून ठेवावा. या सगळ्या गोष्टी माशाला लावून थोडा वेळ तसेच ठेवावेत.

जे डाएट करतात त्यांच्यासाठी ही रेसिपी उत्तम आहे. त्यामुळे आवडीचे पदार्थ खाल्लेही जातात आणि डाएटही फॉलो केलं जातं. अशा या डाएटच्या वेळापत्रकामध्ये तुम्ही विविध प्रकारचे मासे घेऊ शकता. ही रेसिपी करताना मासा वाफवण्यावर जास्त भर देण्यात आला आहे. यासाठी प्रथम गॅसवर नॉनस्टिक पॅन तापवून घ्यावा. त्यात एक चमचा तेलामध्ये लसूण बारिक ठेचून टाका आणि नंतर मसाला लावून ठेवलेला मासा पॅनमध्ये वाफवून घ्या. साधारण २ ते ३ मिनिटांमध्ये हा मासा शिजतो. मासा शिजल्यानंतर तो परतायचा आणि पुन्हा वाफवू द्यायचा. जवळपास १० मिनिटांमध्ये मासा शिजून तयार होतो. या रेसिपीसाठी तुम्हाला अगदी कमी वेळ लागतो. हा पदार्थ तुम्ही रोटी, चपातीबरोबर खाल्ला तरी चालतो किंवा नुसता खाल्ला तरीही तो उत्तम लागतो.

आम्ही घरी संध्याकाळी ७ ते ७.३० पर्यंत जेवतो त्यानंतर आमच्याकडे जेवण होत नाही. दुपारचं जेवण साग्रसंगीत करायचं आणि रात्रीच जे काही जेवणार असू तर ७ ते ७.३० या वेळेत ते जेवायचं हा आमच्या घरचा नियमच आहे. त्यामुळे जेवण पचलं जातं आणि आरोग्यही चांगलं राहतं. भरपूर सलाड, दूध, तूप, चीज या पौष्टिक गोष्टी खाण्याकडेही आमचा भर असतो.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…