६०० वा प्रयोग आणि पुढील भागाचे सादरीकरण एकाच दिवशी

विविध पुरस्कारप्राप्त ‘यू टर्न’ या नाटकाचा ६०० वा प्रयोग आणि नाटकाचा पुढील भाग अर्थात ‘यू टर्न-२’ असे दोन्ही प्रयोग एकाच दिवशी रंगणार आहेत. या नाटकाचे वैशिष्टय़ म्हणजे नाटकात फक्त दोन कलाकार आहेत आणि तरीही हे नाटक लोकप्रिय  असून गेल्या आठ वर्षांत नाटकाला २७ पुरस्कार व पारितोषिके मिळाली आहेत.

27 Year Old Youtuber Abhideep Saha Dies Video of No Passion No Vision In Memes
२७ वर्षीय प्रसिद्ध भारतीय युट्युबरचे निधन; एकाच वेळी अवयव झाले निकामी, कष्टाने कमावले होते ५ लाख सबस्क्राइबर्स
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
IPL 2024 Performance of 5 impact players
IPL 2024 : शिवम दुबे ते साई सुदर्शनपर्यंत ‘या’ ५ ‘इम्पॅक्ट प्लेयर्स’नी पहिल्या १० दिवसात गाजवलं मैदान
Bharti Hexacom initial share sale from 3rd April
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री

१७ डिसेंबर २००८ या दिवशी ‘यू टर्न’ नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला होता. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन आनंद म्हसवेकर यांचे असून डॉ. गिरीश ओक आणि इला भाटे हे ज्येष्ठ कलाकार नाटकात आहेत. अवघ्या दोन कलाकारांच्या या नाटकाने मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रयोग केले आहेत. मूळ नाटकाचे प्रयोग रंगमंचावर सुरू असतानाच नाटकाचा दुसरा भाग आता प्रेक्षकांसमोर येत आहे.

‘यू टर्न’ आणि ‘यू टर्न-२’चे नाटय़प्रयोग सलग एकाच दिवशी करण्याचा विचार असून ‘यू टर्न-२’चे स्वतंत्र प्रयोगही होणार आहेत. नाटकातील नायक-नायिका पुन्हा एकमेकांना भेटतात का? याचे उत्तर ‘यू टर्न-२’ मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘यू टर्न-२’ साठी अभिनेता सचिन खेडेकर, नंदू गाडगीळ, मनोहर सोमण यांचा आवाज दुसऱ्या भागास लाभला आहे.

‘यू टर्न’चा ६०० वा प्रयोग आणि ‘यू टर्न-२’चा शुभारंभ येत्या ११ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथे  आहे. ‘जिव्हाळा’ आणि ‘सुप्रिया प्रॉडक्शन’ने याचे आयोजन केले असून कोल्हापूर येथील प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते डॉ. शरद भुताडिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.