मराठी माणुस असं म्हटलं की त्याचे छत्रपती शिवाजी महाराजांवरचे नित्सिम प्रेम डोळ्यांसमोर येते. देवावर जेवढी श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा या नावावरही लोकं करतात. पण त्याहून अर्धा टक्का जरी काळजी महाराजांनी मेहनतीने बांधलेल्या गड, किल्ल्यांची घेतली असती तर आज महारांपेक्षा खूश दुसरे कोणीच नसते.

हेमंत ढोमेच्या ‘बघतोस काय मुजरा कर’ या आगामी सिनेमामध्येही काहीसा हाच आशय घेण्यात आला आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंतनेच केले असून या सिनेमात जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. आज या सिनेमाचे शिर्षक गीतही प्रदर्शित करण्यात आले आहे.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Wild dogs were found for the first time in Phansad Sanctuary
फणसाड अभयारण्यात पहिल्यांदा आढळला रानकुत्र्यांचा वावर
father and son drown in dhom dam in wai
सातारा: धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू
Udayanaraje Bhosle received a warm welcome in Satara
साताऱ्यात उदयनराजे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन; कोणत्याही परिस्थितीत मी निवडणूक लढविणार

या गाण्यात महाराष्ट्रातले गड किल्ले यांची सध्या झालेली दुरावस्था दाखवण्यात आली आहे. तर दुसरीकडे इंग्रजांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू यांच्यामधला फरक दाखवला आहे. या गाण्यात जितेंद्र जोशी शीवभक्त दाखवण्यात आला आहे तर अनिकेत विश्वासराव एका राजकारणाच्या भूमिकेत दिसत आहे.

सिनेमाचे काही शूट लंडनमध्येही झाले आहे. त्यामुळे जर संहिता चांगली असेल तर आता मराठी सिनेमाही सातासमुद्रापार जातो हेच यातून दिसून येतंय. प्रथमदर्शनी टिझर आणि हे गाणे पाहिल्यानंतर या सिनेमाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढेल यात काही शंका नाही. पुढच्या वर्षी ३ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.