‘मनमौजी जगायचे, स्वच्छंदी उडायचे…’ हे फुगे सिनेमाचे रिफ्रेश करणारे गाणे आजच्या तरुणाईना भुरळ पडणारे आहे. फुग्यांप्रमाणे रंगबेरंगी आणि स्वच्छंदी उडण्याचे स्वप्न कोणाला पडत नसेल? अशा या फुग्यांचे खास आकर्षण असणा-या युवकांना एकत्र आणणाऱ्या हटके कॅम्पेनची कीर्ती कॉलेजमध्ये सुरुवात झाली. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असणा-या ‘फुगे’ या आगामी सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी राबवलेल्या या हटके कॅम्पेनमधून संपूर्ण महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक फुग्यांचे वाटप केले जाणार आहे.

प्रभादेवी येथील कीर्ती कॉलेजमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘फुगे’ सिनेमाच्या म्युजिक टीममधील जान्हवी प्रभू अरोरा आणि निलेश मोहरीर यांनी उपस्थिती लावली होती. एक सूर तर एक ताल असणा-या या दोघांनी कॉलेज विद्यार्थांसोबत धम्माल मस्ती करत, फुग्यांचे वाटप केले. आपल्या सर्वांचे आयुष्य फुग्यांप्रमाणे स्वच्छंदी आणि रंगतदार व्हावे अशी शुभेच्छा या दोघांनी विद्यार्थ्यांना दिला. एवढेच नाही तर जान्हवीने आपल्या मधुर आवाजात फुगे सिनेमातील ‘काही कळे तुला’ हे रॉमेंटीक गाणे गाऊन कार्यक्रम रंगात आणला. तसेच सिनेमाच्या गाण्यावर ठेका धरत आणि फुगे आकाशात उडवत सिनेमाच्या कॅम्पेनची शानदार सुरुवात देखील केली.

Mayawati will start BSPs campaign in Maharashtra from Nagpur
बसपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग मायावती नागपुरातून फुंकणार
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
ED Sheeran
हॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला लागले महाराष्ट्राच्या मिसळ पावचं वेड! ED Sheeranने स्वत: बनवली झणझणीत मिसळ, Video एकदा बघाच
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?

मैत्रीच्या विश्वात रमणाऱ्या आणि बॅचलर लाइफ जगू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ‘फुगे’ हा सिनेमा लवकरच मनोरंजनाची मोठी मेजवानी घेऊन येत आहे. इंदरराज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार, अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी ह्यांची निर्मित असलेला हा सिनेमा स्वप्ना वाघमारे यांनी दिग्दर्शित केला आहे.

प्रेम आंधळे असते… असे म्हणतात, पण जर हे प्रेम दोन मित्रांमध्ये असेल तर ! प्रेमाची ही हटके बॅकस्टोरी सांगणारा ‘फुगे’ हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारी रोजी ‘वेलेन्टाईन्स डे’ च्या आधीच या प्रेमळ दिवसाची मोठी मेजवानी घेऊन येणार आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या फक्कड मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा होत आहे. इंदरराज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार, अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी ह्यांनी ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित हा चित्रपट रंगीबेरंगी फुग्यांप्रमाणे रसिकांचे मनसोक्त मनोरंजन करेल, यात शंका नाही.