मराठी चित्रपटातून आजवर आई-मुलाच्या नात्याचे विविध पैलू पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. त्यापैकीच एका पैलूचे दर्शन ‘किल्ला’ या चित्रपटातून पाहायला मिळाले होते. ‘किल्ला’ या चित्रपटात आई आणि मुलाचं हळवं नातं आपल्या अभिनयातून प्रभावीपणे व्यक्त केलेली अभिनेत्री अमृता सुभाष आणि बालकलाकार आर्चित देवधर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. अमृता सुभाष, आर्चित देवधर आणि सुनील बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘६ गुण’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

‘६ गुण’ या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं असून या पोस्टरनं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टरमधून हा चित्रपट शिक्षणाविषयी भाष्य करत असल्याचं जाणवत असून, लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरलही प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाद्वारे किरण गावडे यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. उज्ज्वला गावडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, अशोक कोटियन आणि शीला राव सहनिर्माते आहेत. बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाचा गौरव झाला असल्यामुळे चित्रपटातील कलाकारांनाही चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत फार अपेक्षा असणार यात शंकाच नाही.

colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
bade miyan chote miyan release date
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’चे प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलले, दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

या चित्रपटात आर्चित-अमृता पुन्हा एकत्र आले असल्याने आणि सुनील बर्वेसारखा उत्तम अभिनेता सोबत असल्याने प्रेक्षकांना उत्तम अभिनयाची मेजवानी मिळणार आहे. पोस्टरमुळे ‘६ गुण’ विषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, ‘किल्ला’ या चित्रपटातील भूमिकांमुळे अमृता आणि आर्चितचं ऑनस्क्रिन नातं प्रेक्षकांच्या जवळ जाणारं आहे. त्यामुळे आता आई-मुलाच्या या जोडीचं हे नवं रुप आणि त्यांच्या नात्याचा एक नवा बाज प्रेक्षकांना भावणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.