महेश लिमये दिग्दर्शित ‘यलो’ सिनेमात आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारी आणि या सिनेमातल्या तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारातील स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळवणारी गौरी गाडगीळ आठवतेय का? तसे तिला विसरणे शक्यच नाही. अशा गौरी विसरल्या जात नाहीत त्या मनाच्या कोपऱ्यात नेहमीच आपली आत्मविश्वास वाढवत असतात.

अशा या गौरीचे कौतुक फक्त महाराष्ट्रानेच केले असे नाही तर संपूर्ण देशाने तिच्यावर यल्लो सिनेमातील तिच्या कामासाठी कौतुकाचा वर्षाव केला होता. आता याच गौरीनं आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. शिक्षणाची ओढ असणाऱ्या गौरीने पदवी मिळवली आहे. कला आणि समाजशास्त्र या विषयात गौरीनं पदवी मिळवली आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Gurugram man paying Rs 30,000 for son's Class 3 fees raises alarm with X post
तिसरीतल्या मुलाची शाळेची महिन्याची फी ३० हजार रुपये; वडिलांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या फेसबुकवर अकाऊंटवरुन त्यांच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. याबाबत त्यांनी पोस्ट टाकून गौरीचं कौतुक केले आहे. मृणाल यांनी लिहिले की, ‘आपली गौरी गाडगीळ आता ग्रॅज्युएट झाली आहे. कला आणि समाजशास्त्र विषय घेऊन तिने ही पदवी मिळवली आहे. खरंच खूप खूप अभिमान वाटतोय. गौरी आणि तिची खऱ्या आयुष्यातील आई स्नेहा हे खरे हिरो आहे. यात तिच्या वडिलांचे आणि धाकट्या बहिणीचेही योगदान तेवढेच आहे. ते कुणीही विसरु शकत नाही. खरंच खूप महान कुटुंब आहे. गाडगीळ कुटुंबाचं मनापासून खूप अभिनंदन.’

या पोस्टनंतर गौरीवर सोशल मीडियावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षावर होत आहे. मृणाल कुलकर्णीच्या या पोस्टला ३ हजारांहून अधिक लाइक्स आले आहेत तर १०० हून अधिक लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.