गेली पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलेल्या ‘पुढचं पाऊल’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत आता प्रेक्षकांना नवा धक्का बसणार आहे. ‘कल्याणी’च्या मृत्यूच्या दु:खात असलेल्या अक्कासाहेबांच्या कुटुंबात आता चक्क नवी कल्याणी येणार आहे.

मालिकेत सध्याच्या टप्प्यावर अक्कासाहेबांच्या कुटुंबात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. बाब्याने घेतलेल्या बदल्यात झालेला कल्याणीचा मृत्यू अक्कासाहेब पचवू शकलेल्या नाहीत. कुटुंबातील कुणीच कल्याणीची जागा घेऊ शकत नाही असे त्यांचे मत असते. इतके दिवस तत्वाला धरून वागणाऱ्या अक्कासाहेब, आता व्यावहारिक होण्याचे ठरवतात. तत्वाला धरून वागून काही उपयोग झाला नाही, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला असतो. अक्कासाहेबांच्या या नव्या रूपानं कुटुंबातील प्रत्येकजण अवाक् झाला आहे. इतक्यातच समीर कल्याणी नावाच्या एका बारडान्सरला भेटतो आणि त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळतं.

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
solapur, Extortion Case, Traders Forced to Pay, Ambedkar Jayanti Celebration, Traders Forced to Pay Ambedkar Jayanti, dr baba saheb ambedkar jayanti, police case,
सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…

आता ही नवी कल्याणी कोण आहे, तिचा नक्की हेतू काय, समीर- कल्याणीचं काही नवं नातं तयार होईल का?, मालिकेच्या या वळणावर अक्कासाहेबांची काय भूमिका असणार? असा उत्कंठावर्धक कथानकाचा प्रवास ‘स्टार प्रवाह’च्या ‘पुढचं पाऊल’मधून घडणार आहे. ‘कल्याणी’च्या भूमिकेला मिळालेली लोकप्रियता पाहता ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

https://www.instagram.com/p/BTLdSDJDHua/

https://www.instagram.com/p/BTMXtuMB89y/