किताबखाना म्हटलं की अनेकांना ही संकल्पनाच आपलीशी वाटते. ती आपलीशी वाटण्याचे कारण म्हणजे पुस्तकं. दोन अनोळखी व्यक्ती भेटल्यावर त्यांच्यामध्ये होणाऱ्या संवादामध्ये एक मुद्दा बऱ्याचदा उचलला जातो तो म्हणजे पुस्तकांचा. आवडत्या पुस्तकाच्या याच चर्चांवरुन अनेकदा मैत्रीचे आणि नात्यांचे असे काही बंध जुळतात की ते ‘जिंदगी के हमराही…’ का काय असतं ना अगदी तशीच साथ देतात. अशी असतात ही पुस्तकं. एकदा आपल्या आयुष्यात येतात आणि आयुष्यभरासाठी आपलीच होऊन जातात. अशा या हव्याहव्याशा वाटणाऱ्या किताबखान्याबद्दल यावेळी आपल्याला माहिती देत आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान.

किताबखान्यातील कोणतं एक पुस्तक कधीही वाचायला आवडतं असं विचारलं असता तेजश्रीने चटकन ‘मृत्युंजय’ या पुस्तकाचं नाव घेतलं. शिवाजी सावंत लिखित या कादंबरीविषयी तेजश्री भरभरुन बोलली. ‘मृत्युंजय’ हे एक असं पुस्तक आहे जे मी कधीही वाचू शकते. मी दर पाच वर्षांनी हे पुस्तक पुन्हा वाचते. पुस्तकाच्या प्रत्येक वाचनामध्ये मला एक नवा अनुभव मिळतो. आकलन वाढते.’ असे म्हणत या पुस्तकामध्ये शोण, कर्ण यांच्यातील नात्याचं चित्रण आपल्याला भावल्याचं तेजश्रीने सांगितलं आहे.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

मृत्युंजयविषयी आणखी सांगताना ती म्हणाली, ‘महाभारतात त्यावेळी ज्याप्रमाणे कृष्णनितीने १०० कौरवांचा नाश झाला होता, वाईटाचा विनाश झाला होता, त्याचप्रमाणे आपल्या नेहमीच्या आयुष्यातही वाईट प्रवृत्तींचा नाश होतच असतो. महाभारत जरी फार–फार पूर्वीच्या काळात लिहिलं गेलेलं असलं तरीही त्याचं प्रतिबिंब आजही आपल्या आयुष्यात पाहायला मिळत आहे. मी हे पुस्तक जेव्हा जेव्हा वाचते तेव्हा तेव्हा ते मला वेगवेगळ्या पद्धतींनी उलगडत जातं. त्यामुळे कोणी मला पुस्तकांविषयी विचारलं तर मी हे पुस्तक वाचण्याचा सल्ला नेहमीच देते. या पुस्तकातील भाषा, शिवाजी सावंत यांची लेखनशैली, त्यांनी केलेलं नात्यांचं चित्रण, रंगवलेली पात्र हे सारं काही जणू पुस्तक वाचताना तुमच्या डोळ्यांसमोर उभं राहतं.

‘माझ्या किताबखान्याविषयी आणखी सांगायचं झालं तर त्यात विविध प्रकारची पुस्तकं आहेत. पण, तुलनेने मी मराठी साहित्य वाचनाला जास्त प्राधान्य देते. मराठी ही इतकी प्रगल्भ भाषा आहे की प्रत्येक शब्दाचे विविध अर्थ, त्याचे प्रतिशब्द सारं काही आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातं’, असं म्हणत तेजश्रीने ती सध्या वाचत असलेल्या पुस्तकाचा उल्लेखही केला. सध्या ती ‘युगंधर’ हे पुस्तक वाचण्यात मग्न आहे. त्यामुळे आता ‘युगंधर’ तेजश्रीला कितपत भावतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com