गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या पिळदार शरीरयष्टीने अनेकांचीच मनं जिंकली आहेत. सुरुवातीला सलमान खान आणि संजय दत्त या कलाकारांनी आणि त्याही आधी धर्मेंद्र आणि दारा सिंग यांनी पिळदार शरीरयष्टीचा ट्रेंड चित्रपटसृष्टीत आणला होता. या कलाकारांनी आणलेला हा ट्रेंड अनेकांनीच फॉलो करत व्यायामशाळा आणि शारीरिक सुदृढतेला महत्त्व दिलं जाऊ लागलं. पण, आता मात्र या कलाकारांची जादू फिकी पडणार आहे असंच चित्र दिसतंय आणि त्यामागचं कारण आहे एक आयपीएस अधिकारी.

फक्त चित्रपटांमध्येच पोलीस अधिकाऱ्यांचं सुदृढ व्यक्तिमत्त्व दाखवलं जातं असा जर का तुमचा समज असेर तर हा आयपीएस अधिकारी तुमचा समज मोडित काढण्यासाठी सज्ज झालाय. सचिन अतुलकर नावाच्या या आयपीएस अधिकाऱ्याने सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. वयाच्या २२ व्या वर्षी सचिनला आयपीएस अधिकाऱ्याचा हुद्दा मिळाला. त्याच्या व्यक्तिमत्वामुळे सध्या सोशल मीडियावरही त्याच्याच चर्चा सुरु आहेत. चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणेच सचिनचं रुपही अनेकांच्याच हृदयात घर करत आहे.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हेच आजच्या भारतीय लोकशाहीचे वास्तव
Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

आपल्या कामाप्रती तत्पर असलेला हा अधिकारी फिटनेसलाही तितकच महत्त्व देतो. तो सध्या मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये कामावर रुजू झाला आहे. शारीरिक सुदृढतेसोबतच त्याने खेळांमध्येही नैपुण्य मिळवलं आहे. काही वेबसाइट्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार आयपीएस ट्रेनिंगच्या दिवसांमध्ये सचिनला घोडेस्वारी आवडू लागली. त्याच्या याच आवडीमुळे २०१० मध्ये घोडेस्वारीमध्ये त्याला सुवर्णपदकही मिळालं होतं. सचिन सध्या अनेकांच्याच चर्चेचा विषय ठरत असून त्याच्या फेसबुक पोस्टवरही बऱ्याच कमेंट पाहायला मिळत आहेत. अनेक फॉलोअर्सनी त्याच्या कामाचंही कौतुक केलं आहे. सर्वात फिट आणि देखणा आयपीएस अधिकारी म्हणून सचिनची प्रशंसाही केली जात आहे.